जरंडेश्वर कारखान्याने सरकारची मालमत्ता हडपली; भाजप नेत्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जरंडेश्वर कारखान्याने संपूर्ण क्षेत्राला २० फूट उंचीची संरक्षक भिंत बांधली असून, रस्त्यासाठी अवैधरीत्या उत्खनन केलेल्या मुरूम व डबराची रॉयल्टी कारखान्याने बुडवली आहे.
Jarandeshwar Sugar factory
Jarandeshwar Sugar factorysocial media
Published on
Updated on

कोरेगाव : जिहे- कटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या मालकीच्या ११ एकर जमिनीवर जरंडेश्वर कारखान्याने अतिक्रमण करत संरक्षक भिंत बांधून सरकारची कोट्यवधींची मालमत्ता हडप केली आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे बबनराव कांबळे यांनी केला असून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

यासंदर्भातील निवेदनात बबनराव कांबळे यांनी म्हटले की, जिहे-कटापूर योजनेसाठी चिमणगांव येथील जरंडेश्वर कारखान्याची गट क्रमांक ७९५ व ८०८ मधील अनुक्रमे ८० व ७७ गुंठे जमीन शासनाने संपादित केली आहे. शेत जमिनीच्या नोंदी २३ ऑक्टोबर २०१२ रोजी मंजूर झाल्या आहेत. जरंडेश्वर कारखान्याने संपूर्ण क्षेत्राला २० फूट उंचीची संरक्षक भिंत बांधली असून, रस्त्यासाठी अवैधरीत्या उत्खनन केलेल्या मुरूम व डबराची रॉयल्टी कारखान्याने बुडवली आहे.

Jarandeshwar Sugar factory
सातारा जिल्हा बँक नाबार्डच्या 'उत्कृष्ट कार्यक्षमता' पुरस्काराने सन्मानित

याबाबत महसूल प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली आहे. अतिक्रमित क्षेत्रातून २५ फूट खोलीवरून जिहे- कटापूर योजनेची पाइपलाइन गेली असून, तेथून पाण्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. जरंडेश्वर कारखान्याने नुकसान भरपाई घेतली नसल्याचे सांगितले जाते. पाइपलाइनच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याने भविष्यात ही मालमत्ता कारखान्याची होऊ शकते. त्यामुळे तत्काळ कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.

आरोपांमध्ये तथ्य नाही....

जरंडेश्वर शुगर मिलचे कार्यकारी संचालक व्ही. आर. जगदाळे यांनी 'जरंडेश्वर' संदर्भातील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. कारखान्याने सुरक्षेसाठी संरक्षक भिंत बांधली आहे, अतिक्रमण केले नाही. कॅंपसमधून 'जिहे-कटापूर'ची पाइपलाइन गेली असून, तिच्या मेंटेनन्ससाठी कधीही, कोणतीही अडचण येणार नसल्याचे श्री. जगदाळे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com