Shivendrasinh Bhosale : ...अन्‌ मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी तिकिट काढून केला एसटी बसने प्रवास!

Satara St Bus News : एसटी बसच्या लोकार्पण सोहळ्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतः तिकिट काढून नवीन बसमधून फेरफटका मारत एसटी प्रवासाचा आनंद लुटला. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तिकिट काढून केलेला एसटी बस प्रवास विशेष चर्चेचा ठरला आहे.
Shivendrasinh Bhosale
Shivendrasinh BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Satara, 16 February : जावली तालुक्यातील मेढा आगाराला राज्य सरकारकडून आठ नवीन एसटी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तिकिट काढून एसटी बसमधून फेरफटका मारत प्रवासाचा आनंद लुटला. या वेळी मंत्री भोसले यांनी परिवहन अधिकाऱ्यांना बसच्या वेळापत्रकाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना केली.

सातारा (Satara) जिल्ह्याच्या जावली तालुक्याचा बहुतांश भाग हा दुर्गम आणि डोंगराळ आहे. त्यामुळे सुखकर प्रवासासाठी या भागातील नागरिकांकडून एसटी बसचा पर्याय निवडला जातो. मात्र, मेढा आगारातील अनेक बसगाड्या ह्या जुन्या आणि खिळखिळ्या झालेल्या होत्या, त्यामुळे मार्गावर अनेक एसटी बसेस बंद पडण्याचे प्रकार घडत होते. त्याचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता.

मेढा आगारासाठी नवीन एसटी बस मिळाव्यात, अशी मागणी प्रवाशांबरोबरच अधिकाऱ्यांकडून होत होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinh Bhosale) यांच्याकडे नव्या एसटी बस उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. शिवेंद्रसिंहराजे यांनीही पाठपुरावा करून राज्य परिवहन विभागाकडे नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश आले असून मेढा आगाराला नुकत्याच नवीन ८ एसटी बस मिळाल्या आहेत. त्यामुळे जावळी तालुक्यातील प्रवाशांबरोबरच विद्यार्थी आणि ग्रामस्थांची सोय झाली आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी फीत कापून एसटी बसचे लोकार्पण केले.

Shivendrasinh Bhosale
Narayan Patil : विरोधकांच्या बालेकिल्ल्यात जाऊन नारायण पाटलांचा गर्भित इशारा; म्हणाले, ‘त्यांना सुटी देणार नाही...’

एसटी बसच्या लोकार्पण सोहळ्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतः तिकिट काढून नवीन बसमधून फेरफटका मारत एसटी प्रवासाचा आनंद लुटला. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तिकिट काढून केलेला एसटी बस प्रवास विशेष चर्चेचा ठरला आहे.

मेढा आगाराला नवीन एसटी बस उपलब्ध झाल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. नवीन बसेस मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. विद्यार्थ्यांना आता चांगल्या बसमधून शाळा, महाविद्यालयांमध्ये वेळेत पोचता येणार आहे.

Shivendrasinh Bhosale
Mohol Politic's : मोहोळचं राजकारण पुन्हा पेटलं; उमेश पाटलांचा अजिंक्यराणा पाटलांवर पलटवार, म्हणाले, ‘बैलगाडीखाली कुत्रं नव्हे...’

दरम्यान, मेढा आगारातील अधिकाऱ्यांनी एसटी बसचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे. वेळेत एसटी बस सोडाव्यात त्यातून प्रवाशाची गैरसोय टाळावी, असे आवाहन मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com