
Satara News : सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेत्याकडे आयकर विभागाकडून तपासणी सुरु होती. ही चौकशी अखेर पाचव्या दिवशी संपली. आयकर विभागाचे पथक 5 फेब्रुवारी रोजी सातारा जिल्ह्यातील नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. आयकर विभागाकडून गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्या घरी आणि कार्यालयात तपासणी सुरु केली. त्यानंतर त्यांचे समर्थक देखील ठिय्या मांडून बसले होते.
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कमटॅक्स विभागाने छापा टाकला. बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास इन्कमटॅक्स विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर पोहचले होते. त्यांनंतर त्यांच्या बंगल्याची झाडाझडती सुरु केली होती. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. बंगला परिसरात पोलिस पथक तैनात करण्यात आले होते.
आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी बुधवारी नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी, पुण्यातील निवासस्थानी, गोविंद मिल्क डेअरीवर तपासणी सुरु केली होती. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करण्यापूर्वीच हा छापा टाकला होता.
या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, ही पॉलिटिकल रेड होती किंवा नव्हती हे मला माहीत नाही. मात्र, सध्याचा काळ असा आहे की कशाला पॉलिटिकल म्हणायचे? हा अत्यंत अवघड प्रश्न आहे. पाच तारखेपासून ही चौकशी सुरु करण्यात आली होती. आयटी विभागाच्या (IT raid) अधिकाऱ्यांना जे पाहिजे होते ते त्यांनी पाहिले. बँकेचे लॉकर्स पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
पाच दिवसांपासून घरी आणि कार्यालयात आयकर विभागाने तपासणी सुरु केली. त्यानंतर त्यांचे समर्थक देखील ठिय्या मांडून होते. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. आता येत्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ते करणार होते. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे. दरम्यान, आमच्या डेअरीचे कामकाज अत्यंत समाधानकारक असल्याचे आयटी अधिकाऱ्यांना दिसून आले असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.