Congress News : निवडणुकीअगोदरच काँग्रेसवर मोठी नामुष्की; तिकिट जाहीर झालेल्या उमेदवाराचा ‘MIM'मध्ये प्रवेश

Firdous Patel Join MIM : सोलापूर महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराने राजीनामा देत एमआयएममध्ये प्रवेश केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
Firdous Patel
Firdous PatelSarkarnama
Published on
Updated on
  1. सोलापूर महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून जाहीर उमेदवाराने पक्ष सोडून एमआयएममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

  2. प्रभाग १६ ब मधील काँग्रेस उमेदवार फिरदोस मौलाली पटेल यांनी अवघ्या दोन दिवसांत काँग्रेसची उमेदवारी नाकारली.

  3. या निर्णयामुळे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या सूनबाई सीमा यलगुलवार यांच्या निवडणुकीवरही अनिश्चिततेचे सावट आले आहे.

Solapur, 28 December : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसवर सोलापुरात मोठी नामुष्की ओढावली आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवाराने पक्षाचा राजीनामा देऊन एमआयएममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे महापालिकेचा रणसंग्राम सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, काँग्रेस उमेदवाराने पक्ष बदलायचा निर्णय घेतल्यामुळे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या सूनबाई ‘डेंजर झोन’मध्ये आल्याचे मानले जात आहे. कारण एमआयएमध्ये प्रवेश केलेल्या उमेदवाराच्या भरावशावरच यलगुलवार यांच्या सूनेने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दोन दिवसांपूर्वी वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक १६ ब मधून माजी नगरसेविका फिरदोस मौलाली पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र अवघ्या दोन दिवसांत फिरदोस पटेल यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पटेल यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

फिरदोस पटेल ह्या काँग्रेसची उमेदवारी घेण्यावरून द्विधा मनस्थितीत होत्या. त्यांचा ओढा एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. त्याबाबत त्यांनी समर्थकांशी चर्चा केली होती. पण, दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत फिरदोस पटेल यांचे नाव होते. मात्र, काँग्रेसची उमेदवारी नाकारत त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Firdous Patel
Ajit Pawar Angry : नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना एबी फार्मच दिला नाही; अजितदादांनी सोलापुरातील प्रमुख नेत्यांना झाप झापले

फिरदोस पटेल यांना काँग्रेसने प्रभाग १६ ब मधून उमेदवारी दिली होती. त्यांच्यासोबत प्रभाग १६ क मधून माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांची सून सीमा मनोज यलगुलवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पटेल यांच्या उमेदवारीची यलगुलवार यांना मदत होणार होती. मात्र, फिरदोस पटेल यांनीच काँग्रेसची उमेदवारी नाकारत एमआयएममध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले आहे.

Firdous Patel
Satej Patil : एक निवडून आला आणि तिघे पडले, तर विजयी नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार, सतेज पाटलांची कार्यकर्त्यांना तंबी

Q1. काँग्रेसला सोलापुरात धक्का कसा बसला?
जाहीर उमेदवार फिरदोस पटेल यांनी काँग्रेस सोडून एमआयएममध्ये प्रवेश केला.

Q2. फिरदोस पटेल यांना काँग्रेसने कुठून उमेदवारी दिली होती?
प्रभाग क्रमांक १६ ब मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

Q3. पटेल यांच्या निर्णयाचा कोणावर परिणाम होऊ शकतो?
प्रभाग १६ क मधील सीमा यलगुलवार यांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Q4. फिरदोस पटेल काँग्रेस सोडण्यामागचे कारण काय मानले जाते?
त्यांचा कल एमआयएम व राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com