Solapur Politics : भाजपचे युवा नेते, माजी नगरसेवक देवेंद्र कोठेंच्या विरोधात गुन्हा दाखल

Devendra Kothe News : आमदार राम सातपुते यांच्यासाठी सोलापुरातील कर्णिक नगरच्या लिंगराज वल्याळ मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत देवेंद्र कोठे यांचे भाषण झाले होते. त्या भाषणात त्यांनी मुस्लिम धर्मियांविषयी भावना दुखावणारे विधान केले होते.
Devendra Kothe
Devendra KotheSarkarnama

Solapur, 17 May : भारतीय जनता पक्षाचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार सभेत धार्मिक भावना दुखावणारे विधान केल्याप्रकरणी भाजपचे युवा नेते, माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्यावर सोलापूरमधील जेल रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आमदार राम सातपुते यांच्यासाठी सोलापुरातील कर्णिक नगरच्या लिंगराज वल्याळ मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत देवेंद्र कोठे (Devendra Kothe) यांचे भाषण झाले होते. त्या भाषणात त्यांनी मुस्लिम धर्मियांविषयी भावना दुखावणारे विधान केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Kothe
Pawar-Tatkare News : पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला तटकरेंची भेट; अनिल देशमुखांचा दुजोरा

गोरक्षकांचे रक्षण करण्यासाठी आगामी काळात कडक कायदा निर्माण करण्यात यावा, अशी मागणी देवेंद्र कोठे यांनी केलली होती. त्या भाषणात बोलताना त्यांनी मुस्लिम धर्मियांविषयी भावना दुखावणारे विधान केले होते. तसेच, राहुल गांधी यांच्या महिलांना एक एक लाख रुपये देण्याच्या विधानाचा मुस्लिम धर्मियांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न कोठे यांनी केला होता.

माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या विरोधात मुस्ताक महबूब शेख यांनी जेल रोड पोलिस ठाण्यात तक्रार (Police Case) दिली होती. एक मे रोजी घडलेल्या गुन्ह्या प्रकरणी देवेंद्र कोठे यांच्यावर 17 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात ( Solapur Lok Sabha Constituency) भाजपकडून आमदार राम सातपुते, तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडाला होता. या प्रचाराच्या दरम्यानच देवेंद्र कोठे यांनी हे धार्मिक भावना दुखावणारे विधान केले होते. सोलापूर लोकसभेसाठी सात मे रोजी चुरशीने 59.19 टक्के मतदान झाले आहे. येत्या चार तारखेला मतमोजणी होणार आहे.

Devendra Kothe
Girish Mahajan : संकटमोचक गेले कुठे?; नाशिक-दिंडोरीच्या प्रचारातून गिरीश महाजन गायब!

कोण आहेत देवेंद्र कोठे?

देवेंद्र कोठे हे सोलापूरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते महेश कोठे यांचे पुतणे आहेत. ते माजी नगरसेवक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र कोठे यांनी नागपूर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात आक्रमक प्रचार केला आहे.

Devendra Kothe
Nashik Lok Sabha : महिलांची गर्दी न जमल्याने नीलम गोऱ्हेंचा नाशिकमधील मेळावा रद्द करण्याची नामुष्की

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com