Pawar-Tatkare News : पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला तटकरेंची भेट; अनिल देशमुखांचा दुजोरा

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी (ता. 16 मे) सायंकाळी मनमाड येथे दिंडोरीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी सभा झाली. मनमाडची ती सभा संपवून पवार हे नाशिकमधील हॉटेलमध्ये मुक्कामाला आले होते.
Sharad Pawar-Sunil Tatkare- Anil Deshmukh
Sharad Pawar-Sunil Tatkare- Anil DeshmukhSarkarnama

Nashik, 17 May : ज्येष्ठ नेते शरद पवार मुक्कामी असलेल्या नाशिकमधील हॉटेलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी रात्री भेट दिल्याची चर्चा आहे. शरद पवार गटातील नागपूरचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये पुन्हा गाठीभेटी सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची गुरुवारी (ता. 16 मे) सायंकाळी मनमाड येथे दिंडोरीचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी सभा झाली. मनमाडची ती सभा संपवून पवार हे नाशिकमधील हॉटेलमध्ये मुक्कामाला आले होते.

विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाधक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हेसुद्धा गुरुवारी नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर होते. सुनील तटकरे यांनी गुरुवारी रात्री या हॉटेलला भेट दिल्याची चर्चा आहे. त्याला अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Sunil Tatkare- Anil Deshmukh
Nashik Lok Sabha : महिलांची गर्दी न जमल्याने नीलम गोऱ्हेंचा नाशिकमधील मेळावा रद्द करण्याची नामुष्की

खासदार सुनील तटकरे हे ह्या हॉटेलला येऊन गेल्याचे आम्हाला कळाले. माझी काय त्यांच्याशी भेट झाली नाही. पण, आमच्या काही कार्यकर्त्यांची भेट झाली. बाकी कोणाच्या भेटी झालेल्या नाहीत, असे माजी मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.

येत्या 4 जूननंतर महायुतीमधील अनेक नेते नाराज होणार आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांची ४ जूननंतर मुलाखती घ्या. त्यांनी उचलेल्या पावलाला महाराष्ट्रातील जनता योग्य उत्तर देईल, तेव्हा त्यांना तोंड दाखवायलासुद्धा जागा राहणार नाही. जे आम्हाला सोडून गेले आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा घ्यायचं नाही. हे आमच्या पक्षाचे धोरण आहे, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

Sharad Pawar-Sunil Tatkare- Anil Deshmukh
Girish Mahajan : संकटमोचक गेले कुठे?; नाशिक-दिंडोरीच्या प्रचारातून गिरीश महाजन गायब!

दरम्यान, नाशिकमध्ये जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय दिसत नाहीत. राष्ट्रवादीच्या आमदारांचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारात दिसून येत आहेत. भुजबळही नाराज असल्याची चर्चा आहे.

नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदारांना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय व्हावे, हे सांगण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तटकरे हे गुरुवारी नाशिकमध्ये आले होते. त्याचवेळी दिवसभर गाठीभेटी घेऊन रात्री परत जाताना तटकरे यांनी पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला भेट दिल्याची चर्चा आहे.

Sharad Pawar-Sunil Tatkare- Anil Deshmukh
Solapur Lok Sabha : सोलापुरात प्रणिती शिंदे की राम सातपुते जिंकणार?; राष्ट्रवादी-मनसेत लाखाची पैज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com