Sharad Pawar : योगी आदित्यनाथ यांचे शिवरायांबाबत विधान; शरद पवारांचे सडेतोड उत्तर, काय आहे प्रकरण?

Yogi Adityanath : चुकीच्या इतिहास सांगितला जात असल्याचा आरोप करत राज्यातील विरोधक आक्रमक
Yogi Adityanath, Sharad Pawar
Yogi Adityanath, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. रामदास स्वामी शिवरायांचे गुरू होते, या आशयाचे वक्तव्य केल्याने राज्यातील विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)चे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवारांनी समाचार घेतला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुण्यातील आळंदी येथील गीता भक्ति अमृत महोत्सवात उपस्थित होते. यावेळी आदित्यनाथ यांनी शांतीगिरी महाराज यांची समर्थ रामदास यांच्याशी तुलना केली. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांबाबत एक विधान केले. समर्थ रामदासांनी शिवरायांना ज्या पद्धतीने मार्गदर्शन केले त्याच पद्धतीने शांतीगिरी महाराज मार्गदर्शन करतात, असे आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले. यावरून राज्यातील विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

Yogi Adityanath, Sharad Pawar
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ठाकरे गटाचं ठरलं! ओवळा माजिवाडात मणेरा हेच उद्याचे 'नरेश'

योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या भूमित समर्थ रामदासांनी शिवरायांना घडवले. ते त्यांना मार्गदर्शन करत होते, असे सांगणे म्हणजे माता जिजाऊ यांचे शिवरायांच्या जडणघडणीतील अस्तित्व नाकारण्यासारखेच आहे. जिजामाता यांचे कर्तृत्व आता दुसऱ्यांना देण्याचे काम सुरू असल्याची टीकाही पवारांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

योगी आदित्यनाथ नेमके काय म्हणाले?

महाराष्ट्राला अनेक वर्षे संतांचा सहवास लाभल्याने येथील लोक भाग्यवान आहेत. समर्थ रामदास यांनी याच भूमित छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवरायांनी मुगल बादशाह औरंगजेब यांना आव्हान दिले. आज कुणीही औरंगजेबचे नाव घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात भक्ती आणि शक्तीचा वास दिसतो. आपले मूळ छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असेही ते म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Yogi Adityanath, Sharad Pawar
Abhishek Ghosalkar Case : आमच्या विरोधात षडयंत्र; लेकाच्या हत्येने हादरलेल्या विनोद घोसाळकरांच्या तीव्र भावना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com