Gen Alpha School Election : छत्रपती संभाजीनगरने दिली पहिली महिला मुख्यमंत्री; Gen Alpha ने उधळला गुलाल!

first female Chief Minister news : छत्रपती संभाजीनगरने दिली पहिली महिला मुख्यमंत्री. या ऐतिहासिक घडामोडीनंतर Gen Alpha ने गुलाल उधळत जल्लोष केला. जाणून घ्या संपूर्ण बातमी.
Gen Alpha School Election : छत्रपती संभाजीनगरने दिली पहिली महिला मुख्यमंत्री; Gen Alpha ने उधळला गुलाल!
Sarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पारधी येथील राजर्षी शाहू विद्यालयात झालेल्या एका अनोख्या निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिसणारा जल्लोष येथे पाहायला मिळाला. मात्र हा जल्लोष होता शालेय विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीचा. Gen Alpha पिढीतील विद्यार्थ्यांनी या निवडणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि मुलीने बाजी मारत शाळेची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला.

विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदान प्रक्रिया, संसदीय कामकाज आणि प्रशासनाची प्रत्यक्ष माहिती मिळावी, या उद्देशाने राजर्षी शाहू विद्यालयात दरवर्षी विद्यार्थी संसद निवडणूक आयोजित केली जाते. यंदाही मतदानाची प्रक्रिया नियोजनबद्ध, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी गुलाल उधळत आणि आनंद व्यक्त करत मोठा जल्लोष केला.

Gen Alpha School Election : छत्रपती संभाजीनगरने दिली पहिली महिला मुख्यमंत्री; Gen Alpha ने उधळला गुलाल!
Monsoon Session 2026 : विरोधकांच्या गोंधळात सरकारचा मास्टरस्ट्रोक; पाच महत्वाची विधेयके मंजूर, अधिवेशनाचे सूप वाजले...

मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या विद्यार्थिनीने आनंद व्यक्त करताना सांगितले, “आज आमच्या शाळेमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि यामध्ये माझी मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. आमच्या शाळेतील संपूर्ण मतदान प्रक्रिया अतिशय छान पद्धतीने पार पडली. या उपक्रमामुळे आम्हा विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क काय असतो, तो कसा बजावायचा, मतदान कसे करायचे आणि लोकशाही कशी चालते हे सर्व प्रात्यक्षिकाद्वारे व्यवस्थित कळाले.

आता मी मुख्यमंत्रीपदी निवडले गेले असल्यामुळे मला मनापासून खूप आनंद होत आहे. आगामी काळात मी आमच्या शाळेच्या प्रगतीसाठी आणि शिस्तीसाठी चांगले कार्य करेन तसेच सर्व मित्र-मैत्रिणींच्या सर्व समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन.”

या निवडणुकीत 98 मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्याची गृहमंत्रीपदी निवड झाली. त्याने सांगितले, “गृहमंत्री म्हणून माझे मुख्य कार्य शाळेतील सर्व मुलांच्या आणि मुलींच्या अडचणी समजून घेणे आणि त्या लवकरात लवकर सोडवणे हेच असणार आहे.”

Gen Alpha School Election : छत्रपती संभाजीनगरने दिली पहिली महिला मुख्यमंत्री; Gen Alpha ने उधळला गुलाल!
TET News: मदरसा असो वा वैदिक पाठशाळा; टीईटी बंधनकारक होणार? अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांची सुप्रीम कोर्टात याचिका

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ निवडणुकीचा अनुभव मिळत नाही, तर नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, जबाबदारी आणि लोकशाही मूल्येही शिकायला मिळत आहेत. Gen Alfa पिढीतील विद्यार्थ्यांचा हा उत्साह भविष्यातील लोकशाही प्रक्रियेसाठी सकारात्मक संदेश देणारा ठरत आहे. त्यामुळे संभाजीनगरमधील या शालेय निवडणुकीची सध्या विशेष चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com