
Kolhapur, 31 December : एकेकाळी कोल्हापूर महापालिकेवर महाडिक गटाची सत्ता असताना त्याला सुरुंग लावण्याचे काम काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांनी केले. गेल्या दहा वर्षांच्या महापालिकेच्या राजकारणात आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ हे एकत्र सत्तेवर राहिले आहेत. मात्र, हसन मुश्रीफ हे आता महायुतीसोबत आहे, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हे दोन दिग्गज एकत्र येण्याची शक्यता कमीच आहे. कारण स्वतंत्र लढले तरी सत्तेसाठी पुन्हा मुश्रीफांना शिवसेना-भाजपसोबत जावे लागू शकते.
मागील काळात हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि सतेज पाटील हे एकत्र आल्याने कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद आणि गोकुळ दूध संघावर एकतर्फी सत्ता मिळाली होती. दोघांच्या राजकीय मैत्रीची ओळख पूर्ण जिल्ह्याला आहे. सध्या पाटील हे महाविकास आघाडीचे नेते, तर मुश्रीफ हे महायुतीतील मंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीतदेखील काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कागल विधानसभा मतदारसंघात मुश्रीफ यांच्या विरोधात उघडपणे प्रचारात उतरले नसल्याचे दिसले होते.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुश्रीफ व पाटील पुन्हा एकत्र येऊ शकतात का? असा सवाल सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आहे.
एकंदरीतच, राजकीय समीकरणांचा विचार केल्यास सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. तर हसन मुश्रीफ हे महायुतीचे नेते आहेत. राज्याचा राजकीय समीकरणांचा विचार करतात या दोघांची मैत्री असली तरी सध्या एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत, त्यामुळे पक्षीय दबाव यांच्या मैत्रीत अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षीय दबावामुळे या दोघांना एकत्र येता येणार नाही. महायुती म्हणून एकच राजा त्यांना सतेज पाटील यांच्या विरोधात उतरावे लागणार आहे. स्वतंत्र लढले तरीदेखील त्यांना पाटील यांच्या विरोधातच लढावे लागणार आहे. निवडणुकीनंतर महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोल्हापूर महापालिकेवर २००९ ते २०१४ च्या कार्यकाळात हसन मुश्रीफ व सतेज पाटील हे एकत्र आले होते. त्यावेळी भाजप विरोधात होता. मात्र, मुश्रीफ महायुतीत गेल्याने आता भाजप आणि शिवसेना सोबत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवल्यास या सर्वांच्या विरोधात लढावे लागणार आहे. मात्र, निकालानंतर महायुती म्हणून सत्ता स्थापन होऊ शकते. मात्र, पाटील यांच्यासोबत मुश्रीफ यांना जाता येणार नाही, असेच एकंदरीत सध्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.