Cabinet Expansion : कोल्हापूर जिल्हातील 'या' नेत्यांची संधी हुकली; मंत्रिपदाच्या नव्या फॉर्म्युल्यामुळे आशा पल्लवीत?

Kolhapur Mahayuti Leaders Missed Ministerial Chance : कोल्हापूर जिल्हातील या नेत्यांनी मंत्रिपदाच्या शर्यतीत फिल्डिंग लावली होती पण त्यांची संधी यावेळेस हुकली आहे. पण नव्या फॉर्म्युल्यामुळे या नेत्यांना आशा पुन्हा आशा लागून राहिली आहे. संधी हुकल्यामुळे समर्थकांमध्ये नाराजीचा सुर निर्माण झाला आहे.
Kolhapur
KolhapurSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारात दोन कॅबिनेट मंत्री पद मिळाले. मात्र या शर्यतीत जिल्ह्यातील पाच नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. अखेर हसन मुश्रीफ आणि प्रकाश अबिटकर यांना संधी मिळाली. मात्र या शर्यतीत तिघांची संधी हुकली आहे त्यामुळे समर्थकांमध्ये नाराजी आहे.

जनसुराज्य शक्तीचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांना मात्र मंत्रीपदाने हुलकावणी दिली. मात्र मंत्रिपदाच्या शर्यतीतून जरी हे तिघे मागे पडले असले तरी नव्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पुढच्या अडीच वर्षात क्षीरसागर आणि यड्रावकर यांना मंत्रीपदाची संधी मिळणार अशी आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

Kolhapur
Shiv Sena Ministers : शिवसेनेच्या 'या' 11 नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ

रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्यातील तीन नेत्यांना संधी मिळाली. आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्रीपदावर वर्णी लागली. तर कोल्हापूर जिल्ह्याचे पुत्र पण पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून दोघांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले अन्य तीन समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी देखील मंत्रीपदावर दावा केला होता. मात्र शिवसेनेच्या नव्या फॉर्मुलानुसार प्रत्येकाला अडीच अडीच वर्षाची मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. तर दुसरीकडे आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपदावर राहणाऱ्या राजेंद्र पाटील यड्रावकरांनी देखील मंत्रीपदावर दावा केला होता.

Kolhapur
MLA Madhuri Misal : नगरसेविका ते सलग 4 वेळा आमदार; पश्चिम महाराष्ट्रातून मंत्रीपद मिळालेल्या एकमेव महिला

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना हुलकावणी मिळाली. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळेल अशी आशा आता शिरसागर आणि यड्रावकर यांना देखील आहे. तर भाजपमधील घटक पक्ष असलेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रीपदावर राहणाऱ्या विनय कोरे यांना युती सरकारच्या काळात मंत्रिपदावर मोहर उठवता आली नाही.

Kolhapur
Meghana Bardikar: पती IPS अधिकारी, वडील पाच वेळा आमदार; मंत्री मेघना बोर्डीकर कोण आहेत?

यंदाच्या महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद दिले जाईल याची चर्चा होती. मात्र त्यांना सुद्धा या मंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे समर्थकांमध्ये मोठी नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार विनय कोरे यांची मोठी मदत शिवसेनेला झाली होती. शिवाय अडचणीच्या काळात ही ते भाजपसोबत राहिले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र मंत्रिमंडळ स्थान न मिळाल्याने नाराजीची भूमिका आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com