Arjun Khotkar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिलेदार अडचणीत; इंदापूर तालुक्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Police Case : आमदार अर्जुन खोतकर यांनी सलग दोन दिवस खाटिक समाजाबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांच्या विधानामुळे खाटिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या हेात्या.
Arjun Khotkar
Arjun Khotkar Sarkarnama
Published on
Updated on

Baramati, 31 August : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण खाटीक समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणे आमदार खोतकर यांच्या अंगलट आले आहे. त्यांच्या विरोधात इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भिगवण पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी जालना पोलिसांकडे वर्ग केला आहे.

बारामती येथील खाटीक समाजाचे कार्यकर्ते करण सुनील इंगुले यांनी याबाबतची फिर्याद भिगवण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्या फिर्यादीवरून शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर (Arjun Khotkar ) यांच्या विरोधात भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आमदार अर्जून खोतकर यांनी खाटीक समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर आमदार खोतकर यांच्या विरोधात खाटीक समाजाच्या वतीने बारामतीसह राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. बारामती (Baramati) येथील करण इंगुले यांनी ‘अर्जून खोतकर यांच्या विरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.

Arjun Khotkar
Laxman Hake : लक्ष्मण हाकेंवर पुरंदरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न; ‘चहा पित असताना शिवीगाळ करत माझ्या अंगावर धावून आले...’

बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर करण इंगुले यांनी काही दिवस उपोषणही केले होते. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवरही कमालीचा दबाव होता. अखेर भिगवण पोलिसांनी अर्जुन खोतकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Arjun Khotkar
Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; ‘ते तर मराठा समाजाला लागलेला कलंक, मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी समाजाशी गद्दारी करू नका’

आमदार अर्जुन खोतकर यांनी सलग दोन दिवस खाटिक समाजाबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांच्या विधानामुळे खाटिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या हेात्या. त्यामुळे या प्रकरणी आमदार खोतकर यांच्या विरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com