
Sharad Pawars News : लोकसभेनंतर मुळ प्रवाहात न राहिल्याने महाविकास आघाडीला विधानसभेवेळी मोठा फटका बसला. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजप, शिवसेना शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 232 उमेदवार विजयी झाले. यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच महायुतीत मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू झाले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठे नेते प्रवेश करत असून राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ‘ऑपरेश टायगर’ सुरू आहे. या ‘ऑपरेश टायगर’वर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांची हवाच काढली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला राज्यातील प्रमुख पक्ष लागले आहेत. एकीकडे भाजप सदस्य नोंदणी करत गाव पातळीवर पोहण्याचा प्रयत्न करत आहे. तर शिवसेना शिंदे गट ऑपरेशन टायगरमधून प्रमुख नेते आणि पदाधिकारी आपल्या पक्षात घेऊन संघटन मजबूत करत आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना खिळखिळी केली जात आहे. अनेक नेत्यांसह पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे शिवबंधन काढून हातात शिवधनुष्य आणि कमळ घेतलं आहे.
दरम्यान राज्यात सुरू असणाऱ्या आणि चर्चेत असणाऱ्या शिवसेनेच्या ‘ऑपरेश टायगर’वर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी असे कोणते ऑपरेशन राज्यात सुरू आहे, याची आपल्याला कल्पना नसल्याचे सांगितले आहे. तर काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सर्व खासदारांची बैठक झाली. या बैठकीत तिन्ही पक्षातील खासदारांशी तीन तास चर्चा झाली. यावेळी सर्वच्या सर्व खासदार आप आपल्या पक्षातच राहणार असून त्यांच्या मनात फुटण्याचा कोणताच विचार नसल्याचे सांगितले आहे.
या बैठकीत उद्धव ठाकरेंचे खासदार देखील होते. त्यांनी देखील एक विचाराने उद्धव ठाकरेंबरोबर राहणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले. तर यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीच दिवसांपूर्वी दिलेल्या ‘हलके में मत लो’च्या इशाऱ्याचाही समाचार घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ‘हलके में मत लो’ असा इशारा दिला होता. पण ‘हलके में मत लो हे काही प्रकरण आहे का? आणि आपल्याला जेवढं मराठी कळतं त्यात हा शब्द नाही’ असे म्हणत ‘हलके में मत लो’ची हवा काढली आहे.
दरम्यान दिल्लीमध्ये आयोजित साहित्य संमेलनामध्ये शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता वाद सुरू झाला आहे. गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप करताना, एका पदासाठी उद्धव ठाकरे यांना दोन मर्सिडीज द्यावा लागतात, असा गौप्यस्फोट केला होता.
यालाही शरद पवार यांनी प्रत्युत्त देताना, संजय राऊत यांच्या टीकेला खरं ठरवलं आहे. तसेच राऊत जे म्हणाले ते 100 टक्के बरोबर असून नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबाबत असे भाष्य करण्याची गरज नव्हती असे म्हटले आहे. अधिवेशन चांगलं चालेलं असताना, सर्वांचा सहभाग चांगला असताना नाही त्या गोष्टी काढायला नको होत्या, असंही नीलम गोऱ्हे यांना शरद पवार यांनी सुनावलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.