Ambadas Danve : अंबादास दानवेंनी नीलम गोऱ्हेंना डिवचले; म्हणाले, 'हा तर नमकहरामीपणा...'

Political controversy News : शिवसेनेत इतर महिलांना संधी न देता नीलम गोऱ्हेंना यांना संधी देण्यात आली. तुम्ही गद्दारी केली तर केली. आहे त्या ठिकाणी तरी नीट राहा, असा सल्ला त्यांनी दिला.
Neelam gorhe, ambadas Danve
Neelam gorhe, ambadas Danve Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिल्लीमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे हे दोन मर्सिडीज घेतल्यानंतर पद देत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली आहे.

नीलम गोऱ्हेंना (Neelam Gorhe) 4 वेळा उमेदवारी दिली. दोनवेळा त्यांना उपसभापती केले. पक्षात देखील दोन पद दिले. त्यांनी प्रत्येक वेळी 2 मर्सिडीज म्हणजे 12 मर्सिडिज दिल्या का ? त्या कुठून आणल्या. त्या महिला आहेत म्हणून शब्द वापरता येत नाहीत पण नमकहरामीपणा केला जातोय, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

Neelam gorhe, ambadas Danve
Shivsena UBT : दापोली नगरपंचायतीत ठाकरे गटाला धक्का? विषय समित्यांवर महायुतीचे वर्चस्व, योगेश कदमांनी बाजी मारली

शिवसेनेत इतर महिलांना संधी न देता नीलम गोऱ्हेंना यांना संधी देण्यात आली. तुम्ही गद्दारी केली तर केली. आहे त्या ठिकाणी तरी नीट राहा, असा सल्ला त्यांनी दिला. औकात नसलेल्या मंडळींना संघटनेच्या ताकदीवर पद मिळाली. मी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी कुठून मर्सिडिज देणार होतो, असा सवाल यावेळी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला.

Neelam gorhe, ambadas Danve
Shivsena UBT News : मर्सिडीजमधून फिरणारा होणार उबाठाचा संपर्कप्रमुख !

किमान बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तरी इमान राखायला हवे होते. हे पाप तुम्हाला इथेच फेडावे लागणार आहे. तुम्हाला किती सुरक्षा वाढवायाची असेल तर ती वाढवा. शिवसैनिक हे ठरवून आंदोलन करत नसतात. साहित्य संमेलन हे वेगळं व्यासपीठ आहे. तिथे सुद्धा घाण करुन ठेवली आहे, असा आरोप यावेळी दानवे यांनी केला.

Neelam gorhe, ambadas Danve
Sharad Pawar Criticized Neelam Gorhe : 'मर्सिडीज'चा आरोप अन् शरद पवारांनी नीलम गोऱ्हेंचा सगळा इतिहासच काढला; म्हणाले, 'त्यांच्या चार टर्म...'

माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल बोलताना दानवे म्हणाले तुमची मंत्री पदावर राहण्याची लायकी नाही. दिल्या भाकरीचे राहा. तुम्हाला वेगळा न्याय आणि सुनील केदारांना वेगळा न्याय दिला जात आहे. ऑनलाईन प्रत मिळत नाही. तुम्ही वकील आहात ना? तुम्हाला माहिती नाही का ? शंका येते अशा शब्दांत कोकाटेवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याबद्दल दानवे यांनी नाराजी व्यक्त केली.

Neelam gorhe, ambadas Danve
Sharad Pawar : फडणवीसांनंतर शरद पवारांकडूनही नीलम गोऱ्हेंची कानउघडणी; म्हणाले, 'ते' वक्तव्य टाळायला हवं होते...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com