BJP Politics : जयंत पाटील भाजपमध्ये आल्यास त्यांची काय अवस्था होईल? चंद्रकांतदादांनी पडळकरांचं नाव घेत जे सांगितल ते धक्कादायक!

Chandrakant Patil Politics Gopichand Padalkar VS Jayant Patil : जयंत पाटील हे भाजपमध्ये आले तर त्यांची अवस्था काय होईल, हे जाहीर सभेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगून गोपीचंद पडळकरच मुख्य नेते राहतील, असा संदेश दिला.
BJP MLA Gopichand Padalkar And  Jayant Patil
BJP MLA Gopichand Padalkar And Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil News : जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सातत्याने होत असतात. स्वतः जयंत पाटील यांनी या बाबात आपण कोठेही जात नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यात गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्याविषयी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे जयंत पाटील विरुद्ध पडळकर संघर्ष तीव्र झाला असताना जयंत पाटील हे भाजपमध्ये आले तर काय होईल, हे मंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले, 'जयंतराव भाजपमध्ये येणार नाहीत. आणि जरी ते भाजपमध्ये आले तरी त्यांना गोपीचंद पडळकरच्या मागे बसावे लागेल. जिल्ह्यात गोपीचंद सिनीअर आहेत आणि ते ज्युनिअर. त्यांना घोषणा द्याव्या लागतील की गोपीचंद पडळकर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.'

विरोधकांना उद्देशून चंद्रकांत पाटील म्हणाले, 'तुम्ही म्हणताय जयवंतरावांना भाजपमध्ये आणण्यासाठी ही धडपड चालू आहे. पण ते कुणा कुणाला भेटतात, किती वेळा भेटतात?

'सांगलीत झालेल्या सभेविषयी जयंतराव मला म्हणाले की ही सभा होऊ नये असं वाटत होते. पण एका नेत्याने भरीस घातलं. हा भरीस घालणार कोणता नेता आहे. तो भरीस घालणारा नेता वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्यात आहे. त्याची ही जबाबदारी घेऊ. घोटाळ्याची चौकशी झाली तर गावातून पळून जातील' , असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला.

BJP MLA Gopichand Padalkar And  Jayant Patil
Maratha Reservation : ‘समान आडनाव’ असेल तर मिळेल का कुणबी दाखला? मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाची व्याप्ती वाढवली...

शरद पवारांच्या पाच नेत्यांसाठी 'चक्रव्यूह'

चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नेत्यांसाठी चक्रव्यूह रचले आहे. पाच नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढू, असे म्हणत त्यांनी त्याची जबाबदारी देखील वाटून दिली. जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता ठाण्यातील एक नेता जिरा ताणून बोलत. एका बिल्डर गेला. त्याची डायरी आहे आपल्यापाशी. त्यात नाव आहे. त्याची जबाबदारी मी घेतो अंगावर, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

BJP MLA Gopichand Padalkar And  Jayant Patil
ST Bus Driver Suicide : चालकाने एसटी बसमध्येच घेतला गळफास; एसटी महामंडळात खळबळ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com