Chandrakant Patil : सोलापुरातील भव्य सामूहिक विवाह सोहळा पाहून चंद्रकांत पाटीलही झाले अचंबित, म्हणाले...

Subhash Deshmukh : विवाह सोहळ्यामध्ये 52 जोडपी विवाहबद्ध झाली. स्वागताला आमदार तर आशीर्वादाला खासदारांची उपस्थिती होती.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur Mass wedding News : सोलापूरमध्ये झालेला सामूदायिक विवाह सोहळा पाहून राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा अचंबित झाले. येथील लोकमंगल उद्योग समूहाच्या वतीने रविवारी नववर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वधर्मीयांच्या सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

गोरज मुहूर्तावर झालेल्या या विवाह सोहळ्यामध्ये 52 जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी आमदार सुभाष देशमुख स्वत: गेटवर उभे राहून येणाऱ्या प्रत्येक वऱ्हाडीचे स्वागत करत होते. तर विवाह सोहळ्यात वधुवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्यानशेट्टी आणि सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrakant Patil
Madha Lok Sabha: निंबाळकर की मोहिते पाटील? फडणवीस सोडवणार माढ्याचा तिढा

लोकमंगल उद्योग समूहाच्या वतीने 18 वर्षांपासून भव्य सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावेळी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण 52 जोडप्यांचा विवाह आमदार सुभाष देशमुख यांनी लावला.

आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सामूदायिक विवाह सोहळ्यात आजपर्यंत तब्बल 3 हजार 23 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. विशेष म्हणजे या सर्व जोडप्यांना रविवारच्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. तत्पूर्वी या 52 जोडप्यांची सोलापूर शहरातून बग्गीमधून वरात काढण्यात आली.

विवाह सोहळ्यात प्रत्येक जोडप्याला लोकमंगल समूहाच्या वतीने आकर्षक पोशाख, प्रत्येक वधूला संसारासाठी आवश्यक रुखवताचे साहित्य देण्यात आले. या विवाह सोहळ्यासाठी आलेल्या हजारो वऱ्हाडींना चमचमीत पदार्थांसह जेवणाची मेजवानी देण्यात आली. तसेच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विवाहस्थळी राम आणि हनुमंताची भव्य मूर्ती साकारण्यात आली होती. त्यामुळे हा सर्व साग्रसंगीत सोहळा पाहून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) अचंबित झाल्याचे पाहायला मिळाले.

Chandrakant Patil
Nitesh Rane vs Aditya Thackeray : सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पावरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाले...

आमदार सुभाष देशमुख यांचे हे कार्य पाहून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हेवा व्यक्त केला. चंद्रकांत पाटील म्हणाले, 'आज या विवाह सोहळ्यात उपस्थित राहिल्यानंतर मला आनंद होण्यापेक्षा जास्त या वधुवरांकडे पाहून त्यांच्याविषयी हेवा निर्माण झाला आहे. कारण त्यांना सुभाषबापूंसारखा प्रेम करणारा वडील आणि सासरा मिळाला आहे.'

तसेच 'बापू फक्त लग्न लावून थांबत नाहीत, तर जावयाचे कसे चालले आहे. त्याच्या संसारात काही अडचणी तर नाहीत ना, याची काळजी सातत्याने घेत राहतात. त्यामुळे मला आज हेवा वाटत आहे,' अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

याचबरोबर 'सुभाषबापू आणि त्यांचे पुत्र मनीष, रोहन हे घरच्या मुलीचे लग्न असल्याप्रमाणे जातीने राबतात, असे कौतुकोद्गार चंद्रकांत पाटील यांनी सुभाष देशमुख यांच्याबद्दल काढले.

आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनात आयोजित या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, वारकरी संप्रदायाचे इंगळे महाराज यांच्यासह विविध मठाचे साधुसंत उपस्थित होते.

Chandrakant Patil
CM Shidne : 'आधी कामगारांची थकबाकी द्या मगच क्लस्टरचे काम' ; भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा!

यावेळी खासदार जयसिद्धेश्वर (Jaisiddheshwar) म्हणाले की, 'सुभाष देशमुख यांचा समाजसेवेच्या माध्यमातून सुरू असलेला विवाहसोहळ्याचा यज्ञ कित्येक वर्षापासून सुरू आहे. सुभाष देशमुखांचा हा संकल्प खूपच पवित्र असून तो निरंतर चालू राहील यासाठी माझ्या शुभेच्छा.'

तर आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी म्हणाले, 'राजकारणात राहून समाजकारण कसे करावे आणि ते कशा पद्धतीचे असावे, याचे उदाहरण म्हणजे सुभाष देशमुख यांनी हाती घेतलेले हे सामाजिक कार्य.'

सुभाष देशमुख काय म्हणाले?

सुभाष देशमुख म्हणाले, 'या वर्षाच्या शेवटच्या दिवशी 52 जोडपी नवीन आयुष्यात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वैवाहिक आयुष्याला शुभेच्छा देतो.' तसेच 22 जानेवारीला रामलल्ला जवळपास 550 वर्षांनंतर आपल्या मूळस्थानी विराजमान होत आहेत. या निमित्ताने या नवविवाहित जोडप्यांना आणि सोलापूरकर जनतेला हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे आवाहनही सुभाष देशमुख यांनी यावेळी केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com