Chandrashekhar Bawankule News : भाजपच्या किसान मोर्चा ग्राम परिक्रमा यात्रेचा सांगता समारोह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित कराड तालुक्यातील बेलवाडी येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून बारामती लोकसभेच्या जागेवर विशेष लक्ष दिले असून, तेथे नणंद- भावजय की, अन्य कोण असा सामना होईल, याबाबत चर्चा सुरू आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी केंद्रीय मंत्र्यासह राज्यातील भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. शरद पवार यांनीही बारामतीत लक्ष घातल्याने बावनकुळे म्हणाले, शरद पवार गल्लोगल्ली, दारोदारी फिरून सुप्रियाताईंच डिपाॅझिट वाचवा म्हणतायत.
साताऱ्यातील बेलवाडी (ता. कराड) येथे भाजप किसान मोर्चाच्या ग्राम परिक्रमा यात्रा सांगता सभेत बावनकुळे बोलत होते. या कार्यक्रमाला भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, कराड उत्तरचे युवा नेते मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, धैर्यशील कदम यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. भाजपकडून या कार्यक्रमाच्या निमित्ताने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
सभेच्या स्टेजपर्यंत मान्यवरांना बैलगाडीतून वाजत-गाजत आणण्यात आले. भाजपचे विधानसभेचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar Bawankule) म्हणाले, मला शरद पवारसाहेबांना एक विचारायचं आहे. तुम्ही देशाचे माजी कृषिमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री अन् याचं आता दिवसभर कुठलं काम चालू आहे. या वयातही पवारसाहेबांना घरोघरी फिरावं लागतंय. घरोघरी फिरून ते सुप्रियाताईंचं डिपाॅझिट वाचवा म्हणत आहेत.
तुम्ही जनतेकरिता समाजासाठी काम केलं असतं, तर गावामध्ये फिरण्याची गरज पडली नसती. शरद पवारसाहेबांनी देशकल्याणाकरिता, राष्ट्राकरिता, जनतेसाठी काम केलं असतं तर तुम्ही एक आवाहन केलं असतं. परंतु, पवारसाहेबांना गल्लोगल्ली, दारोदारी फिरायला लागत आहे, यापेक्षा काही वाईट असू शकत नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
साताऱ्याचा तिढा सुटेना...
सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजप की राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाणार याचा तिढा सुटत नाही. ही जागा कुणाची हे अद्याप ठरलेले नाही. तसेच उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची तयारी केली असून, भारतीय जनता पक्षाकडून अजून त्यांना ग्रीन सिग्नल दिला नाही. पक्षांतर्गत उदयनराजेंना मोठा विरोध होत आहे. काल मध्यरात्री प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित कोअर कमिटीची बैठक पार पडली. परंतु, या बैठकीविषयी प्रदेशाध्यक्ष काहीच बोलले नाहीत.
Edited By : Umesh Bambare
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.