Sharad Pawar Vs BJP : भाजपचा 'हा' बडा नेता लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Former BJP MP to join Sharad Pawar's NCP : शरद पवार स्वतः राज्याचे दौरे करत असून, जुन्या लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपचे माजी खासदार कधी जाहीर प्रवेश करत आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Dindori News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षांत उड्या मारल्या आहेत. काही जण स्वत:हून गेले तर काहींना भाजप ईडीच्या भीतीने घेऊन गेले. याचदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर अडचणीत आलेल्या शरद पवार यांनी नव्याने पक्ष बांधणी सुरू केली आहे.

भाजपनेच राष्ट्रवादीत फूट पाडली असा आरोप करत शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला टार्गेट केले आहे. त्यातूनच उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा एक बडा नेता लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. भाजपचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harischandra Chavan) हे भाजपवर नाराज असून, ते शरद पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar
Kolhapur Politics: मुश्रीफांकडून मला त्रास होतोय; भाजपच्या पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप

भाजप (BJP) आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यात अनेक महिन्यांपासून नाराजी वाढत असल्याची परिस्थिती आहे. त्यातून ते भाजपपासून दूर असल्याचे पाहावयास मिळाले आहे, तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांच्या विरोधात हरिश्चंद्र चव्हाण हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आधीपासूनच नाराज असलेले हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर असून, ते लवकरच जाहीर प्रवेश करण्याची शक्यता आहे. असे झाले तर भाजपला दिंडोरी लोकसभेत फटका बसू शकतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असताना भाजपने हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी काढून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. यामुळे हरिश्चंद्र चव्हाण पक्षावर नाराज होते. आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

त्यातच शरद पवार स्वतः राज्याचे दौरे करत असून, जुन्या लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची जोरदार तयारी सुरू असून, चव्हाण कधी जाहीर प्रवेश करत आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

R

Sharad Pawar
Kolhapur Politics: मुश्रीफांकडून मला त्रास होतोय; भाजपच्या पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com