Bawankule on Supriya Sule : बावनकुळे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, कशाला बोंबा मारता?

Narendra Modi : जागतिक महिला दिनाचा मंगल योग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी मोदीजींनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात शंभर रुपयांची कपात केली आहे. पण, हा दिवसही सुप्रिया सुळे यांना राजकीय वाटतो.
Chandrashekhar Bawankule, Supriya Sule
Chandrashekhar Bawankule, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Political News: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात शंभर रुपयांची कपात केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका करताना हा निवडणूक जुमला असल्याचे म्हटले होते.

यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार सुळेंवर हल्लाबोल करत सुप्रियाताई निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सिलिंडरचे दर कमी केल्याच्या कशाला बोंबा मारता, असा सवाल त्यांनी केला आहे.

जागतिक महिला दिनाचा मंगल योग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी मोदीजींनी आज घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात शंभर रुपयांची कपात केली आहे. पण, हा दिवसही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना राजकीय वाटतो.

सिलिंडरचे दर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कमी केल्याच्या सुप्रियाताई कशाला बोंबा मारता, असा प्रश्न करून तुमच्या सरकारच्या काळात पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनीही निवडणुकीच्या तोंडावर नऊवरून १२ सिलिंडर वाढविले होते.

Chandrashekhar Bawankule, Supriya Sule
Supriya Sule News : 'राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही...' ; खासदार सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या...

हे जरुर वाचा म्हणजे तुम्हाला काँग्रेसी (Congress) जुमला कळेल, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी खासदार सुळेंना लगावला आहे. बावनकुळे म्हणाले, सुप्रियाताईंच्या डोक्यात सतत राजकारणच असल्याने त्यांना काळ वेळेचे भान राहात नाही. जुमला हा शब्द मोठ्याने म्हणायचा आणि पिताश्री मंत्री असलेल्या काँग्रेस सरकारची गरिबांची, महिलांची पिळवणूक करणारी कृत्ये नजरेआड करायची.

सुप्रियाताई निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सिलिंडरचे दर कमी केल्याच्या कशाला बोंबा मारता. तुमचे राजकीय शिक्षक तुम्हाला सोयीचे शिकवतात. लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Narendra Modi) डोळ्यांसमोर निवडणुका ठेवत नाहीत.

तो धंदा तुम्हाला पोटापाण्याला लावणाऱ्या मनमोहन सिंग (Manmohan Singh) नेतृत्वातील यूपीए सरकारचा होता. हे मोदी सरकारचे धोरण मातृवंदन आहे. तुम्हाला आठवत नाही म्हणून सांगतो, गेल्यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मोदीजींनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrashekhar Bawankule, Supriya Sule
नवनीत राणांचं काय ठरलं ?, बावनकुळेंनी दिलं स्पष्टीकरण | Navneet Rana | Chandrashekhar Bawankule |

भारतातील ७५ लाख महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिले होते. इतकेच नव्हे, तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांच्या सिलिंडरवर २०० रुपयांची कपात केली होती, आणि उज्ज्वला गॅस योजनेतील (PMUY) माता भगिनींना सिलिंडरवर ४०० रुपयांची सवलत दिली होती, हे जरा त्यांनी आठवावे, असेही त्यांनी नमूद केले.

Edited By : Umesh Bambare

R

Chandrashekhar Bawankule, Supriya Sule
‘निवडणुकीत पवार कुटुंबातील लोक प्रचार...’, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान | Supriya Sule | Baramati |

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com