Sharad Pawar With Fadnavis : शरद पवार-फडणवीसांमध्ये रंगल्या दिलखुलास गप्पा; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

Sharad Pawar With Fadnavis : निमित्त सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण
Sharad Pawar : Devendra Fadnavis
Sharad Pawar : Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur News : पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार दोन्ही नेते एका मंचावर आले होते. यानंतर आज सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोलामध्ये पुन्हा एकदा हे दोन्ही नेते एकत्र आले. यावेळी भाषण करण्याआधी दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या. यामुळे याची राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar : Devendra Fadnavis
NCP Split : राष्ट्रवादीतील अस्थिरता, काँग्रेसचा सावध पवित्रा : ऐनवेळी वेगळा निर्णय घेतला तर..

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सांगोल्यात एकाच मंचावर आले होते. राष्ट्रवादीचा फुट पडल्यानंतर आणि पुण्यातील कार्यक्रमानंतर शरद पवार आणि फडणवीस हे दोन नेते प्रथमच पुन्हा एकत्रित आले होते.

Sharad Pawar : Devendra Fadnavis
Sharad Pawar - Fadnavis News: शरद पवार-देवेंद्र फडणवीस येणार एकाच मंचावर; एकमेकांविषयी काय बोलणार?

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना-भाजपला आपला पाठींबा देवून सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यांनी भाजपाला सातत्याने विरोधच केला होता. यानंतर शरद पवार यांनी भाजप विरोधी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. मात्र आज फडणवीस आणि शरद पवार चर्चा करताना दिसले. यामुळे याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.