Solapur Mahayuti : ‘आम्ही शिंदेनिष्ठच; पण भाजपला धडा शिकविण्यासाठी निवडणूक लढविणार’: शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024: सोलापूर शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेला न सोडणाऱ्या भाजपला धडा शिकविण्यासाठी आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी सांगितले.
Shivsena Leader join Swarajya Party
Shivsena Leader join Swarajya PartySarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 October : सोलापूर शहरातील तीनही जागांवर भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिल्याने संतप्त झालेल्या दोन जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आणि युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा देत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे. हे चारही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ आहोता. मात्र, सोलापूर शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेला न सोडणाऱ्या भाजपला धडा शिकविण्यासाठी आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी सांगितले.

सोलापूर (Solapur) शहरातील सोलापूर शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेला सोडावा, अशी शिवसेनेचे मागणी होती. मात्र, जागा वाटपात सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण या तीनही मतदासंघातून भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या विरोधात उमेदवारी देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही भाजपकडून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून देवेंद्र कोठे यांना उमेदवारी दिली होती.

देवेंद्र कोठे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, सोलापूर शहरप्रमुख मनोज शेजवाल आणि युवा सेनेचे प्रमुख उमेश गायकवाड यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षात सोमवारी रात्री उशिरा प्रवेश केला.

Shivsena Leader join Swarajya Party
Pandharpur Vidhan Sabha: पंढरपुरात आघाडीत बिघाडी; आरोग्य मंत्र्यांच्या पुतण्याला शरद पवारांकडून उमेदवारी

दरम्यान, या नेत्यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोलापूर (Solapur) शहर उत्तर मतदारसंघातून जिल्हाप्रमुख अमोल शिंदे , शहर मध्य मतदारसंघातून मनिष काळजे तर सोलापूर शहर दक्षिण मतदारंघातून उमेश गायकवाड, तर आण्णाप्पा सत्तुबार हे अपक्ष निवडणूक लढविणार आहेत.

याबाबत मनीष काळजे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये चुकीच्या पद्धतीने जागा वाटप झाले आहे. भारतीय जनता पक्षाने सोलापूर शहरातील सर्वच जागा चुकीच्या पद्धतीने स्वतःकडे घेतल्या आहेत, त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांच्या स्वाभिमानाला ठेच पोचली आहे.

Shivsena Leader join Swarajya Party
Karmala Assembly : दिग्विजय बागल शिवसेनेत प्रवेश करणार; करमाळ्यातून धनुष्यबाणावर लढवणार विधानसभा

आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ आहोत. मात्र, आमचा स्वाभिमान दुखावला गेला आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला धडा शिकविण्यासाठी आम्ही स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com