Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या यादीनंतर आज (बुधवार) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील 65 उमेदवारांचे घोषणा केली.
शिंदेंनी जाहीर केलेल्या 45 उमेदवारांपैकी 33 जागांवर ठाकरेंचे उमेदवार थेट टक्कर देणार आहेत. मुंबई आणि कोकण हे शिवसेनेचे बालेकिल्ले राहिले आहेत. त्यामुळे येथे कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. कोकणामध्ये पाच ते सहा जागांवर थेट शिवसेना UBT विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. त्यामुळे कोकणाचा बालेकिल्ला कोणत्या शिवसेनेचा हे विधानसभा निवडणुकीत कळणार आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून रत्नागिरीमधून उदय सामंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर राजापूरमधून किरण सामंत, सावंतवाडीमधून दीपक केसरकर, दापोलीमधून योगेश कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, कुडाळच्या उमेदवारीसाठी निलेश राणे यांना शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना येथून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीमधून बाळ माने, राजापूरमधून राजन साळवी, सावंतवाडीमधून राजन तेली, दोपोलीमधून संजय कदम आणि कुडाळमधून वैभव नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव यांना गुहागर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंची शिवसेना लढणार की भाजप हे अजून ठरले नाही त्यामुळे भास्कर जाधवाच्या विरोधातील उमेदवार अजूनही ठरलेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.