बंडखोर नेत्यांच्या पुतळ्यास दिली मिरच्यांची धुरी... वडूजमध्ये सेनेचे अनोखे आंदोलन

तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे Shahajiraje Godse म्हणाले, जिल्ह्यातील काही नेत्यांनी शिवसेनेच्या Shivsena जीवावर निवडून येऊन मंत्री पदे मिळविली. आता आर्थिक प्रलोभनाला बळी पडून पक्षाशी गद्दारी केलेल्या अश्‍या नेत्यांना शिवसैनिक जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाहीत.
Shivsena Vaduj Andolan
Shivsena Vaduj Andolan sarkarnama

वडूज : बंडखोर नेत्यांचं करायचं काय...खाली मुंडी वर पाय...अशा विविध निषेधार्थ घोषणाबाजी करत वडुज येथील शिवसैनिकांनी आज शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा झाडाला उलटा टांगून त्यास मिरच्यांची धुरी देत अभिनव आंदोलन केले.

मंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून सद्या निर्माण केलेल्या अस्थिरतेबाबत येथे तालुका शिवसेनेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी माजी तालुका प्रमुख युवराज पाटील, उपतालुका प्रमुख महेश गोडसे, बाळासाहेब जाधव, आबासाहेब भोसले, संतोष दुबळे, विशाल चव्हाण, सुशांत पार्लेकर, महिला संघटिका राणीताई काळे, दिलशाद तांबोळी, आशाताई कोळी, सलमा शेख, संध्या देशमुख, धनश्री इनामदार, आदी उपस्थित होते.

Shivsena Vaduj Andolan
Eknath Shinde: दहा ते बारा खासदार शिंदेंच्या संपर्कात- भाजप खासदाराचा दावा

एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई व महेश शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळा करून तो येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाजवळ एका झाडाला उलटा टांगण्यात आला. तेथे शिवसैनिकांनी बंडखोर नेत्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर हा पुतळा उलटा टांगून त्यास मिरच्यांची धुरी दिली. यावेळी बोलताना तालुकाप्रमुख श्री. गोडसे म्हणाले, ''जिल्ह्यातील काही नेत्यांनी शिवसेनेच्या जीवावर निवडून येऊन मंत्री पदे मिळविली.शिवसेनेच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यावधी रूपयांची विकासकामे करून गाजावाजा केला. आता आर्थिक प्रलोभनाला बळी पडून पक्षाशी गद्दारी केलेल्या अश्‍या नेत्यांना शिवसैनिक जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाहीत.''

Shivsena Vaduj Andolan
आठ महिन्यांपूर्वीच ठरला होता बंडखोरीचा प्लॅन; शिवसेना नेत्याचा खळबळजनक खुलासा

तालुक्यातील शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कायम आहे. मात्र, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकविला जाईल. श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातून पोटापाण्यासाठी मुंबईला गेलेल्या रिक्षावाल्या,भाजीवाल्या अशा सर्वसामान्य घटकांतील लोकांना शिवसेनेने संधी दिली. त्यांना मोठी पदे देखील दिली आहेत. त्यापैकी काहींनी शिवसेनेशी गद्दारी केली अश्‍या गद्दारांना जनता माफ करणार नाही.

Shivsena Vaduj Andolan
सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी... शेखर गोरे

मिरचीची धुरी....

आंदोलनादरम्यान शिवसैनिक व महिलांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, महेश शिंदे यांच्या पुतळ्याला उलटे टांगून जोरदार घोषणाबाजी करीत निषेधाच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच पुतळ्याला मिरचीची धुरी देखील दिली. अश्‍या बंडखोरांना अशीच अद्दल घडविली पाहीजे अश्‍या भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com