NCP News : राष्ट्रवादीत मोठी घडामोड; भाजपत गेलेल्या प्रदेश उपाध्यक्षाच्या घवापसीची चर्चा, पण शहराध्यक्षांचा विरोध

Solapur Corporation Election 2025 : भाजपत उमेदवारीला होणारा विरोध लक्षात घेऊन किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे. प्रवेशाच्या अनुषंगाने जाधव आणि गायकवाड यांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
Dattatray Bharane-Kisan Jadhav-Nagesh Gaikwad
Dattatray Bharane-Kisan Jadhav-Nagesh GaikwadSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघ्या एका दिवसाचा कालावधी उरलेला असताना सोलापूरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मध्यरात्री भाजपमध्ये प्रवेश करणारे माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या घरवापसीची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या प्रवेशाला खुद्द शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर पठाण यांनी विरोध केल्याची माहिती पुढे येत आहे.

सोलापूर (Solapur) महापालिका निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेना-भाजप युतीची चर्चा सुरू असताना प्रत्यक्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे. या युतीमध्ये दोन्ही पक्षांनी फिफ्टी-फिफ्टी असा जागा वाटपाचा फार्म्युला ठरला आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन भाजपपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसरीकडे भाजप (BJP) अंतर्गत वादामुळे प्रचंड अडचणीत सापडला आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनी कोठे समर्थकांना जागा सोडण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती आमदार देशमुख यांनी धुडकावून लावली आहे, तर गोरे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आमदार सुभाष देशमुख यांनीही प्रभाग २२ मधून शीतल गायकवाड यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर महापलिकेची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्याच प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी भाजपत प्रवेश केल्याने पक्षातील निष्ठावंतांनी तिकिट न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला. तसेच, दोन्ही देशमुखांनी निष्ठावंत कार्यकर्ते ज्या पक्षात जातील, त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे सांगितले.

Dattatray Bharane-Kisan Jadhav-Nagesh Gaikwad
NCP Vs Congress : "आम्ही शरद पवारांच्या माणसाला घेऊ शकतो अन् त्याला सन्मानही देऊ शकतो" : पुण्यात एका काँग्रेस नेत्याच्या उद्योगाने आघाडीला सुरूंग

भाजपत उमेदवारीला होणारा विरोध लक्षात घेऊन किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे. प्रवेशाच्या अनुषंगाने जाधव आणि गायकवाड यांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या घरवापसीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी कडाडून विरोध केला आहे, त्यांना पक्षात घेतल्यास आम्ही पक्षातून बाहेर पडून, असा इशारा त्यांनी दिला आहे, त्यामुळे जाधव आणि गायकवाड यांच्या घरवापसी लांबणीवर पडली आहे.

Dattatray Bharane-Kisan Jadhav-Nagesh Gaikwad
Supreme Court News : मोठ्या वादानंतर माजी CJI गवई यांच्या महत्वपूर्ण निकालाला स्थगिती; मोदी सरकारला नोटीस

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com