Prashant Paricharak : ‘मला माढ्यात पाठवून पंढरपुरातील विरोधकांची वाट सोपी करायची का?’; प्रशांत परिचारकांचे पंढरपुरातून लढण्याचे संकेत

Pandharpur-Mangalvedha Assembly Constituency : प्रशांत परिचारक किंवा उमेश परिचारक माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवणार, अशी चर्चा चार दिवसांपासून पंढरपूर आणि माढा मतदारसंघात रंगली होती. त्यावर प्रशांत परिचारक यांनी आज पडदा टाकला.
Prashant Paricharak
Prashant ParicharakSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 26 September : गेल्या चार दिवसांपासून माजी आमदार प्रशांत परिचारक कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याची प्रचंड उत्सुकता पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात होती. ती उत्सुकता संपवत माजी आमदार परिचारक यांनी आगामी विधानसभेची निवडणूक पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

तसेच, ‘मला माढ्यात पाठवून पंढरपुरातील विरोधकांची वाट सोपी करायची का?’ असा सवालही त्यांनी पत्रकारांना केला, त्यामुळे भाजपकडून नेमके कोण लढणार आणि ऐनवेळी परिचारक तुतारी हाती घेणार की अपक्ष लढणार, याकडे आता पंढरपूरवासियांचे लक्ष असणार आहे.

पांडुरंग परिवाराच्या बैठकीत माढ्यातून उमेश परिचारक यांनी, तर पंढरपूरमधून प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे प्रशांत परिचारक किंवा उमेश परिचारक माढ्यातून निवडणूक लढवणार, अशी चर्चा चार दिवसांपासून पंढरपूर आणि माढा मतदारसंघात रंगली होती. त्यावर प्रशांत परिचारक यांनी आज पडदा टाकला.

पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा वाखरी (ता. पंढरपूर) येथील प्रशासकीय कार्यालयासमोर आज गुरुवारी (ता. 26 सप्टेंबर) झाली. त्या सभेनंतर माध्यमांशी बोलताना प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर-मंगळवेढा (Pandharpur-Mangalvedha) मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले.

माढ्यातून प्रशांत परिचारक किंवा उमेश परिचारक निवडणूक लढविणार या सध्या सुरू असलेल्या चर्चेबाबत विचारले असता माजी आमदार परिचारक म्हणाले, मला माढ्यात पाठवून पंढरपूरमधील माझ्या विरोधकांची वाट सोपी करायची आहे काय तुम्हाला? ऐनवेळी माढ्यातून लढणे शक्य नाही, असे सांगून माढ्यातून निवडणूक लढविण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

Prashant Paricharak
Sharad Pawar NCP : तुतारीवर विधानसभा लढण्याची 1350 जणांची इच्छा; अहिरेंच्या देवळालीतून सर्वाधिक इच्छूक!

दुसरीकडे, घरातील सगळ्यांनीच जर राजकारण केले तर व्यवसाय उद्योग कोणी करायचे. बघू अजून वेळ आहे. योग्यवेळी निर्णय घेऊ, असे उमेश परिचारक यांच्या माढ्यातून निवडणूक लढविण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर उत्तर दिले. त्यामुळे परिचारक यांच्या घरातून एकच व्यक्ती निवडणूक लढवणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक हे सध्या भारतीय जनता पक्षात आहेत. पंढरपूरमधून सध्या भाजपचेच समाधान आवताडे आमदार आहेत. त्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Prashant Paricharak
Vidarbha Politics : अमित शहांच्या ‘टार्गेट’ला मित्रपक्ष शिवसेनेकडूनच सुरुंग; सर्व्हेचा हवाला देत 24 जागांवर केला दावा

भाजपकडून संधी न मिळाल्यास मोहिते पाटील यांच्याप्रमाणे प्रशांत परिचारक ऐनवेळी तुतारी हाती घेणार की अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com