Paricharak Vs Autade : मंगळवेढा सिंचन योजनेला मंजुरी मिळताच आवताडेंच्या फ्लेक्सवरून परिचारक गायब

Mangalvedha upsa Irrigation Scheme : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी एक पाऊल मागे घेत समाधान आवताडे यांना आमदार करण्यासाठी पंढरपुरातून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी पोटनिवडणुकीत मतदारांना त्यांनी मोठ्या मालकांची (सुधाकरपंत परिचारक) शपथ घालत ‘एक वेळ ऐका’ अशी भावनिक साद घातली होती.
Samadhan Autade Flex
Samadhan Autade FlexSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मोठ्या मालकांची (स्व. सुधाकरपंत परिचारक) शपथ घालून समाधान आवताडे यांना आमदार करणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासोबतच सुधाकर परिचारक यांचे फोटोही आमदार आवताडेंच्या फ्लेक्सवरून गायब झाले आहेत. त्यामुळे आमदार आवताडे व माजी आमदार परिचारक यांच्यात असलेली दरी कायम दिसून आली. परिचारक समर्थकांच्या पांडुरंग परिवार या ‘व्हॉट्स अॅप’ ग्रुपवर त्याबाबतची नाराजी स्पष्टपणे व्यक्त करण्यात आली आहे.

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी एक पाऊल मागे घेत समाधान आवताडे (Samadhan Autade) यांना आमदार करण्यासाठी पंढरपुरातून (Pandharpur) महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी पोटनिवडणुकीत मतदारांना त्यांनी मोठ्या मालकांची (सुधाकरपंत परिचारक) शपथ घालत ‘एक वेळ ऐका’ अशी भावनिक साद घातली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Samadhan Autade Flex
Sule Support to Harshvardhan Patil : हर्षवर्धनभाऊंना शिव्या घातल्या, तर गाठ माझ्याशी आहे; सुप्रिया सुळेंनी केली पाठराखण

समाधान आवताडे यांना आमदार करण्यात प्रशांत परिचारक यांनी मोलाची भूमिका बजावली होती. पोटनिवडणुकीनंतर आमदार समाधान आवताडे यांच्या फ्लेक्सवर विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने (स्व.) सुधाकरपंत परिचारक आणि प्रशांत परिचारक यांचे फोटो वापरले जायचे. मात्र, दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक समर्थकांनी भालके समर्थकांची मदत घेत स्वतंत्र समविचारी आघाडी स्थापन केली. या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा मोठ्या फरकाने पराभव केला. हा पराभव आमदार आवताडे गटाच्या जिव्हारी लागला होता. इतरही कारणांमुळे दोघांमध्ये कुरबुरी सुरू होत्या.

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला राज्या सरकारकडून मुंजरी मिळाली आहे. त्यानंतर प्रत्येक गावोगावी आमदार समाधान आवताडे यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लागले आहेत. त्या फ्लेक्सवरून (स्व.) सुधाकरपंत परिचारक आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे फोटो वापरलेले नाहीत, त्यामुळे परिचारक समर्थकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Samadhan Autade Flex
Madha Loksabha Constituency : विजयदादा, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपविरोधात जाणार नाहीत; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला विश्वास

पांडुरंग परिवार नावाने असलेल्या एका ‘व्हॉट्स ॲप’ ग्रुपमध्ये एका समर्थकाने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यात म्हटले आहे की, आजपर्यंत विद्यमान आमदार (समाधान आवताडे) कोणतीही कार्यक्रम पत्रिका किंवा फ्लेक्सवर सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) व प्रशांत परिचारक यांचा फोटो वापरायचे. परंतु मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर जे फ्लेक्स गावोगावी लावण्यात आले आहेत. त्यावर परिचारक यांचा फोटो नाही. आमदार आवताडेंना प्रशांत परिचारक यांची मदत बहुधा मान्य नसावी; म्हणूनच तालुक्यातील फ्लेक्सवरून प्रशांत परिचारक यांचा फोटो गायब झाला आहे. परिचारक यांना डावलले जात आहे, हे आमच्या लक्षात आले आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत परिचारक स्वतः उभे असतील तरच काम करू; अन्यथा पक्ष वगैरे बाबींचा आम्ही विचार करून निर्णय घेऊ.

दरम्यान, परिचारक समर्थकांच्या त्याच ग्रुपवर प्रत्येक गावांत लावलेले फोटो पडू लागले आहेत, त्यामुळे त्या भूमिकेला इतर समर्थकानेही साद देत पाठिंबा दर्शविल्यामुळे या पुढील काळात परिचारक-आवताडे गटातील दरी कायम राहण्याचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत.

R

Samadhan Autade Flex
Solapur Lok Sabha Constituency : सोलापूरच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम; महाजनांनी दाखवले दिल्लीकडे बोट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com