Dr. Shirish Valsangkar : जवळची व्यक्ती डॉ. शिरीष वळसंगकरांच्या अंगावर तीनवेळा धावून गेली होती...

Solapur Crime News : एका प्रसिद्ध उद्योजकाकडे डॉ. शिरीष वळसंगकर यांनी फोन करून मन मोकळे होते, अशी माहिती पुढे आलेले आहे. हॉस्पिटमधील अनेक जण डॉ. वळसंगकर यांच्याकडे पाहून अपमान सहन करत काम करत होते.
Dr. Shirish Valsangkar
Dr. Shirish ValsangkarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 April : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिला अटक करण्यात आले असून तिला तीन दिवसांची कोठडी मिळाली आहे. तसेच, डॉक्टरांच्या मुलाची आणि सुनेचेही पोलिसांनी चौकशी केली आहे. आता हॉस्पिटलमधील काही घडामोडी बाहेर येत आहेत. एक नातेवाईक डॉ. वळसंगकर यांच्या अंगावर तीनदा धावून गेली होती, तसेच एकदा गालावर...होती, अशी माहिती पुढे आली आहे.

प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी शुक्रवारी (ता. १८ एप्रिल) डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. शवविच्छेदनावेळी डॉक्टरांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली होती. मात्र, त्या आधारे डॉ. अश्विन वळसंगकर यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मनीषा मुसळे माने हिला शनिवारी रात्री उशिरा अटक केली आहे.

दरम्यान, पोलिस चौकशीत (Police Inquary) अनेक गोष्ट बाहेर येत आहेत. डॉ. वळसंगकर हे मानसिकदृष्ट्या अतिशय कणखर होते. एखाद्या अधिकारी महिलेने मेल केला म्हणून आत्महत्या करतील, असे ते व्यक्तीमत्व नव्हते. मात्र, त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून त्यांना गेली वर्षे ते दीड वर्षांपासून अपमानित केले जात होते. त्यांचे ठिकठिकाणी खच्चीकरण केले जात होते. हॉस्पिटलमध्ये त्यांना पूर्वीसारखा सन्मान दिला जात नव्हता.

Dr. Shirish Valsangkar
Dr. Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी डॉक्टराच्या मुलासह सुनेची चौकशी

त्यांच्या एका नातेवाईकाकडून डॉक्टरांचा जागोजागी पाणउतारा केला जात होता. एक-दोनदा नव्हे तर तीन वेळा ती व्यक्ती डॉक्टरांच्या अंगावर धावून गेली होती. तसेच गालावर ....होती, त्यामुळे डॉक्टरांना अपमानित करण्यात येत होते. ज्या मनीष मुसळे-माने हिला प्रशासकीय अधिकारी पदापर्यंत त्यांनी संधी दिली, तीही नातेवाईकांच्या हातातील बाहुले बनली होती. शेवटी शुक्रवारी ते गळ्यापर्यंत आले आणि त्यातूनच डॉक्टरांनी स्वतः संपवले.

पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. मात्र, आत्महत्येपूर्वी आणि त्या अगोदर एक ते दोन दिवस ते कोणा कोणाशी फोनवर बोलले आहेत, यातूनच याबाबतची माहिती पुढे येऊ शकते. पोलिसांनीही डॉक्टरांचा मोबाईल जप्त केला आहे. तसेच, मनीषा मुसळे-माने हिचाही मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यातून काय नवीन महिती पुढे येते, हे पाहावे लागणार आहे.

Dr. Shirish Valsangkar
Vijaykumar Gavit Statement: विजयकुमार गावित पुन्हा बोलले, महायुतीच्या सहकारी पक्षांनी निवडणुकीत फसवले?

एका प्रसिद्ध उद्योजकाकडे डॉ. शिरीष वळसंगकर यांनी फोन करून मन मोकळे होते, अशी माहिती पुढे आलेले आहे. हॉस्पिटमधील अनेक जण डॉ. वळसंगकर यांच्याकडे पाहून अपमान सहन करत काम करत होते. स्वतःच्या हॉस्पिटलमधील कर्तृत्ववान व्यक्तींना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळावी, यासाठी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी प्रयत्न केले होते. डॉक्टरांच्या मोबाईलमधील डेटावरूनच यामागची कारणे पुढे येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com