CM Fadnavis on Gokul : CM फडणवीसांचा आदेश धडकताच गोकुळमध्ये मोठ्या घडामोडी : वेगवेगळे दंड थोपटलेले भाजप-जनसुराज्य शक्ती एकत्र ठराव दाखल करणार

Gokul dairy resolution latest update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर गोकुळमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजप आणि जनसुराज्य शक्ती एकत्र येत संयुक्त ठराव दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
Published on
Updated on

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या गोकुळच्या राजकारणामुळे चर्चेत आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल केले. त्यामुळे आता भाजप देखील आपली गोकुळ मधील ताकद दाखवणार आहे.

त्यांच्यासोबत जनसुराज्य शक्ती देखील आपली ताकद दाखवणार आहे. सोमवार 29 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार भाजप आणि जनसुराज्य शक्ती एकत्र ठराव दाखल करणार आहे. गोकुळ दूध संघाच्या मागील निवडणुकीत भाजपचा सहयोगी पक्ष असलेला जनसुराज्य शक्ती हा आमदार सतेज पाटील आणि तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली लढला.

Devendra Fadnavis
Sudhir Gadgil road accident : भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांचा अपघात; गाडीचा चक्काचूर, एअरबॅगमुळे बचावले

त्यावेळी आमदार डॉ. विनय कोरे हे भाजप नेत्यांच्या विरोधात मैदानात होते. मात्र सध्याची राजकीय समीकरणे पाहिली तर भाजप आणि जनसुराज्य शक्ती महायुती म्हणून एकत्र लढणार आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे ठराव दाखल केले आहेत. तर शिवसेना ही स्वतंत्रपणे ठराव दाखल करणार आहेत.

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार भाजप आणि जनसुराज्य शक्तीला एकत्र सामोरे जावे लागणार आहे. येत्या 29 जूनला रेसिडेन्सी क्लब येथून भाजप आणि जनसुराज्य शक्ती एकत्र शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल करणार आहेत. त्यासंदर्भातील सूचना वरिष्ठ स्तरावरून आल्याची माहिती समोर येत आहे.

Devendra Fadnavis
Dilip Mohite Patil : "अजितदादांचे या तालुक्यावर अनंत उपकार आहेत..." भरसभेत मोहिते-पाटील ढसाढसा रडले; नेमकं काय घडलं?

दुग्धनिबंधकांचे आदेश

ज्या व्यक्तीच्या नावावर ठराव आहे त्यांनी स्वतंत्रपणे ठराव दाखल करावा अशी मागणी ठेवून देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल केले. यावेळी गोंधळ निर्माण झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे दुग्ध निबंधक विभागाकडून गर्दीने ठराव दाखल न करता ते 500 च्या संख्येने दाखल करावेत. प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती सर्वच पक्षीय नेत्यांना केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com