CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यापूर्वी राजकीय भूकंप; ठाकरेंच्या शिवसेनेच्या आरोपांमुळे 'लोकार्पण'चा मुद्दा पेटला!

Thackeray Sena allegations in Kolhapur : मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यापूर्वी लोकार्पणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरेसेनेने केलेल्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटले.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूरात रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जवळपास 545 कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण होणार आहे. रंकाळा तलावातील कारंजा, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण, तसेच छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय यांच्यासह नवीन ई बसच्या सेवा शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

याची संपूर्ण तयारी सुरू असताना ठाकरे सेनेकडून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील विकास कामांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. रुग्णालयातील यंत्रसामुग्रीच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार यांनी केला आहे.

Kolhapur Municipal Corporation
FDA Raid : बीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई, भेसळीचे दोन कोटी रुपयांचे तेल जप्त; चार कंपन्यांना टाळे !

छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे नूतनीकरणाचे लोकार्पण आहे. मात्र ते लोकार्पण नव्हे ते पापार्पण आहे. विकास कामात कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. जी यंत्रसामुग्री खरेदी झाली आहे. ज्या कंपनीकडून ते घेण्यात आले आहे. त्यामध्ये खूप फरक आहे. यंत्रसामग्री खरेदीमध्ये खाजगी रुग्णालयाला दिलेली किंमत आणि सरकारी रुग्णालयाला दिलेल्या किमतीमध्ये मोठी तफावत आहे.

जनतेची आणि सरकारची लूट कोणी केली? हे मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यावर आल्यानंतर तपासावे. अशी मागणी संजय पवार यांनी केली आहे. या विकास कामाची चौकशी न्यायाधीशांच्या मार्फत लावावी. रुग्णालयाच्या कामामधून जनतेचा पैसा कसा लुटला गेला आहे हे जनतेसमोर येईल.

Kolhapur Municipal Corporation
DGP Date Parli Visit : परळीतील गुन्हेगारीविरोधात DGP दातेंचा 'अॅक्शन प्लॅन'; पोलीस स्टेशनला भेट देत महत्त्वाच्या सूचना, घुले हत्याकांड तपासाबाबत कडक निर्देश

या विकास कामातील ज्या ज्या कामाचे लोकार्पण होणार आहे, त्याचे ऑडिट करावे अशी मागणी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केले आहे. शिवाय रुग्णालयाच्या संबंधित ज्या ठेकेदारांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत मात्र त्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याचे देखील संजय पवार यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com