Solapur Shivsena News : दूध प्रश्नारून शिवसेना आक्रमक; ‘दूध दरवाढीचा निर्णय घेऊनच महापुजेसाठी पंढरपूरला या; अन्यथा...’

गाईच्या दुधाला प्रतिलिटर ४० रुपये, तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ६० रुपये दर द्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे.
Shivsena Leader
Shivsena LeaderSarkarnama
Published on
Updated on

Milk Price Hike : राज्यात दुधाचे दर दिवसेंदिवस घसरत चालले आहेत, त्यामुळे शेतीला जोडधंदा करणारे दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. या दूध दराच्या प्रश्नावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दूध दरवाढीचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या महापूजेसाठी यावं; अन्यथा विधान भवनावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. (Come to Pandharpur for Mahapuja only after taking decision to increase price of milk : Shiv Sena's demand)

दूध दराच्या प्रश्नावरून प्रा. हाके यांनी सोलापूर (Solapur) येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात शिवसेनेच्या वतीने दूध दरवाढीसंदर्भात भूमिका घेण्यात आली. आषाढीच्या महापूजेला येताना दूधदरवाढीचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री शिंदे पंढरपूरला (Pandharpur) यावे; अन्यथा आम्ही विधानभवनावर मोर्चा काढू, असा इशारा हाके यांनी दिला आहे.

Shivsena Leader
Mahim Controversial Banner: ठाकरे-आंबेडकरांच्या बॅनरवर औरंगजेबाचा फोटो; माहीममध्ये बॅनर लागल्याने खळबळ

दरम्यान, गाईच्या दुधाला प्रतिलिटर ४० रुपये, तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ६० रुपये दर द्यावा, अशी मागणी शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी, सरकारी, शासकीय मालकीच्या सर्व दूध संस्थांना दूध धोरण जाहीर करत सक्तीने शेतकऱ्यांच्या दुधाचा दर वाढविण्यासंदर्भात आदेश द्यावा, असंही हाके यांनी म्हटलं आहे.

Shivsena Leader
Solapur Politics : ॲक्टिव्ह कोठे अन्‌ अस्वस्थ काडादी सोलापूर भाजपच्या गडाला लावणार सुरुंग

शेजारच्या कर्नाटक राज्यात दुधाला प्रतिलिटर ६ रुपयाचं अनुदान दिलं जातं, गुजरातमध्ये अमूलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिलं जात, त्यामुळं महाराष्ट्रात ही शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान जाहीर करावं, अशीही मागणी या वेळी शिवसेनेकडून करण्यात आली.

Shivsena Leader
Raj Thackeray News: राज ठाकरेंनी फोन फिरवताच‌ जिल्हा बॅंकेच्या वसुलीला तीन महिन्यांची स्थगिती मिळाली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये जर दूध दरवाढ मागणी मान्य झाली नाही, तर प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येईल, असेही या वेळी सांगण्यात आले. या वेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे ,गणेश वानकर,अमर पाटील, यांच्यासह राज्य विस्तारक शरद कोळी,अतुल भंवर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com