Mahim Controversial Banner: ठाकरे-आंबेडकरांच्या बॅनरवर औरंगजेबाचा फोटो; माहीममध्ये बॅनर लागल्याने खळबळ

Thackeray- Ambedkar Banner In Mahim: माहीम परिसरातील शिवसैनिकांकडून ते बॅनर तातडीने हटविण्यात आले आहेत.
Thackeray- Ambedkar banner
Thackeray- Ambedkar bannerSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : वंचित बहुज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्रित असलेल्या बॅनरवर औरंगजेबाचा फोटो छापण्यात आला आहे. ते बॅनर माहीम परिसरात अज्ञातांकडून लावण्यात आले आहेत, त्यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. शिवसैनिकांनी हे बॅनर तातडीने हटविण्यात आले आहेत. ते बॅनर लावणाऱ्यांचा शोध पोलिस घेत आहेत. (Aurangzeb's photo on Uddhav Thackeray- Prakash Ambedkar's banner)

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन फुले वाहिली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हे मान्य आहे का, असा सवाल करत शिवसेनेच्या शिंदे गटाने आणि भाजपने ठाकरे गटावर हल्लाबोल केला होता. आगामी लोकसभा आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि शिंदे गटाकडून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होत आहे का, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Thackeray- Ambedkar banner
Solapur Politics : ॲक्टिव्ह कोठे अन्‌ अस्वस्थ काडादी सोलापूर भाजपच्या गडाला लावणार सुरुंग

भाजपची साथ सोडून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यापासून उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या प्रश्नावरून टीका केली जात आहे. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली आहे, त्यामुळे आंबेडकरांची ही कृती मान्य आहे? असा सवाल भाजपकडून ठाकरे यांना केला जात आहे. त्यातच या बॅनरमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. मुळात हे बॅनर कुणी लावले, असे प्रश्न निर्माण होत आहेत.

Thackeray- Ambedkar banner
Raj Thackeray News: राज ठाकरेंनी फोन फिरवताच‌ जिल्हा बॅंकेच्या वसुलीला तीन महिन्यांची स्थगिती मिळाली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत औरंगजेबाचे छायाचित्र असलेला बॅनर माहिम परिसरात बुधवारी मध्यरात्री लागले आहेत. त्या बॅनरमुळे माहीम परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहीम परिसरातील शिवसैनिकांकडून ते बॅनर तातडीने हटविण्यात आले आहेत.

Thackeray- Ambedkar banner
Ajit Pawar News : निलेश लंके तर 'लंका'च पेटवत चाललाय ! अजितदादांकडून कामाचे कौतुक अन् विरोधकांना चिमटा

पोलिसांनी या बॅनरच्या संदर्भात चौकशी सुरू केली आहे. हे आक्षेपार्ह बॅनर लावणारे कोण आहेत, त्यांचा यामागील उद्देश काय आहे, याची कोणतीही माहिती अद्याप पुढे आलेली नाही. मात्र, अशा प्रकाराचे कायदा-सुव्यवस्था बिघडविणारे बॅनर लावणाऱ्यांवर पोलिस काय कारवाई करतात, याकडे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com