Solapur Lok Sabha Constituency : सोलापुरात प्रणिती शिंदेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

Violation of Code Of Conduct Case : आचारसंहिता कक्षाच्या प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी त्यावर तत्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 April : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल झाली आहे. सोलापूर शहरात विनापरवाना वाहनांवर बॅनर आणि विविध ठिकाणी डिजिटल लावण्यात आले आहेत, अशी तक्रार वैभव बिराजदार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.


Complaint
Complaint Sarkarnama

सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) भाजपकडून आमदार राम सातपुते, तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यात काँटे की टक्कर सुरू आहे. प्रचारात दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. त्यातच आता आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार आचारसंहिता कक्षाच्या प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे दाखल झाली आहे. त्यावर तत्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश कुंभार यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Praniti Shinde
Karmala News : भाजपत जाऊनही बागलांच्या अडचणी संपेनात; दिग्विजय बागलांसह 18 संचालकांवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश

वैभव बिराजदार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, सोलापुरात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. मात्र, सोलापूर शहरातील रिक्षांवर (क्रमांक एम एच १३ बी व्ही १६२८, एमएच १३ जी ९६८०) परवानगी न घेता डिजिटल बॅनर लावण्यात आले आहेत. त्या त्या बॅनरवरील संपर्क क्रमांक ७०६६६२४२२२ हा डायल केल्यावर कॉलर आयडीवर काँग्रेस उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव आढळून येत आहे.

याशिवाय, सोलापूर सोशल फोरमने शहरातील महापौर बंगला, सात रस्ता चौक, शासकीय विश्रामगृह संरक्षण आवार, रंगभवन चौक, नर्मदा हॉस्पिटल, डफरीन चौक, नवल पेट्रोल पंपानजीक या ठिकाणीही विनापरवाना डिजिटल लावून आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे आणि सोलापूर सोशल फोरम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बिराजदार यांनी तक्रार अर्जात केली आहे. .

Praniti Shinde
Madha Lok Sabha 2024 : भाजप कार्यकर्त्याने फडणवीसांना रक्ताने लिहिले पत्र; माढ्याच्या उमेदवारीबाबत केली मोठी मागणी

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या आचारसंहिता कक्षप्रमुख कुंभार यांनी या प्रकरणी तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

R

Praniti Shinde
Solapur Lok Sabha 2024 : प्रणिती शिंदेंना पाठिंबा जाहीर करताना आडम मास्तरांचा ‘शहर मध्य’बाबत मोठा दावा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com