Madha Lok Sabha 2024 : भाजप कार्यकर्त्याने फडणवीसांना रक्ताने लिहिले पत्र; माढ्याच्या उमेदवारीबाबत केली मोठी मागणी

Mohite Patil News : मोहिते पाटील यांच्यावर समर्थकांकडून शरद पवार यांच्या पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा दबाव वाढत आहे. मात्र, मोहिते पाटीलही निर्णय घेत नसल्याचे दिसून येत आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 April : माढा लोकसभा मतदारसंघ निवडणूक घोषित झाल्यापासून चर्चेत आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने मोहिते पाटील यांनी बंड करत मतदारसंघातून प्रचाराचे रान उठविले आहे. समर्थकांकडून मोहिते पाटील यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी दबाव वाढत आहे. भाजपलाही मोहिते पाटील यांच्या बंडखोरीची भीती आहे, त्यांच्याकडूनही मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच आता मोहिते पाटील समर्थक भाजप कार्यकर्त्याने थेट देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्याची मागणी केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Constituency) निवडणूक लढविण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) हे तीव्र इच्छुक आहेत. त्यांनी मागील वर्षभरापासून मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची तयारी केलेली आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र, भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे, त्यामुळे मोहिते पाटील कमालीचे नाराज झाले आहेत, त्यातून त्यांनी बंडाची तयारी चालवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
Lok Sabha Election 2024 : उठा पुणेकरांनो, आळस झटका अन्‌ मतांचा टक्का वाढवा...

मोहिते पाटील यांच्यावर समर्थकांकडून शरद पवार यांच्या पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा दबाव वाढत आहे. मात्र, मोहिते पाटीलही निर्णय घेत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे धैर्यशील माेहिते पाटील हे मतदारसंघात फिरत असताना दुसरीकडे भाजपकडूनही मोहिते पाटील यांना वगळून माढा लोकसभा मतदारसंघासाठी बैठक होत आहेत. माढ्यातील शिंदे बंधूंच्या मदतीच्या जोरावर भाजपकडूनही डावपेच आखले जात आहेत. त्यामुळे मोहिते पाटील समर्थकही आता संताप व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाड येथील महेश लोखंडे या तरुणाने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे भाजपवर दबाव वाढत आहे. भारतीय जनता पक्ष मोहिते पाटील यांची नाराजी दूर करणार की निंबाळकर यांची उमेदवारी रद्द करणार, याची उत्सुकता सोलापूर आणि सातारकरांना आहे.

R

Devendra Fadnavis
Solapur Lok Sabha 2024 : प्रणिती शिंदेंना पाठिंबा जाहीर करताना आडम मास्तरांचा ‘शहर मध्य’बाबत मोठा दावा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com