Chandrakant Gudewar : माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवारांना सोलापुरातून व्हायचंय आमदार; फडणवीसांना साकडे

Solapur City Central Constituency : चंद्रकांत गुडेवार यांना सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवायची आहे, त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भारतीय जनता पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Chandrakant Gudewar
Chandrakant GudewarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 August : सोलापूर, अमरावती आणि सांगलीत आपल्या धडाकेबाज कामगिरीने सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे माजी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना भारतीय जनता पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवायची आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी आयुक्त गुडेवार यांनी तशी इच्छा व्यक्त करत उमेदवारीची मागणी केली आहे.

चंद्रकांत गुडेवार (Chandrakant Gudewar) यांना सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवायची आहे, त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे भारतीय जनता पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून संधी देणार की निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने न्याय देणार, याची चर्चा सोलापूरमध्ये रंगली आहे. तसेच, हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला सुटलेला आहे, त्यामुळे गुडेवारांना भाजपकडून कशी संधी मिळणार, याचीही चर्चा रंगली आहे.

चंद्रकांत गुडेवारी यांनी सोलापूर महापालिकेत आयुक्त म्हणून काम करताना अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. गुडेवार हे सोलापुरात 2013 ते 2015 या काळात महापालिकेचे आयुक्त होते. अनेक धडाकेबाज निर्णयातून त्यांनी सोलापूर शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आयुक्त म्हणून काम करताना ते राजकीय बळी ठरले होते. राजकीय शह कटशहातूनच चंद्रकांत गुडेवार यांची अमरावती महापालिकेत आयुक्त म्हणून बदली झाली होती. त्यावेळी सोलापूरच्या नागरिकांनी मोठे आंदोलन उभारले होते.

Chandrakant Gudewar
Fadnavis BJP National President : ‘ती’ बातमी ऐकूनच चंद्रकांतदादांना आनंद झाला; म्हणाले, ‘आता व्हेरिफाय करतो’

चंद्रकांत गुडेवार हे डिसेंबर 2023 मध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत, त्यामुळे त्यांना आता राजकीय क्षेत्र खुणावत असून विशेषतः सत्ताधारी भाजपकडून निवडणूक लढवण्याची त्यांची प्रबळ इच्छा असल्याचे दिसून येत आहे. मात्र, सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने भाजप तो आपल्याकडे घेऊन चंद्रकांत गुडेवार यांच्यासारख्या माजी अधिकाऱ्याला संधी देणार की पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार, याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पंचायत समितीचे बीडीओ म्हणून चंद्रकांत गुडेवारी यांनी आपल्या प्रशायकीय इनिंगला सुरुवात केली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर उपमुख्य कार्यकारी आधिकारी म्हणूनही काम केले आहे. परभणी, लातूर आणि उस्मानाबाद येथे डीआरडीए म्हणून काम केले आहे.

छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) जिल्हा परिषदेवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. अमरावती, अकोला आणि उस्मानाबादमध्ये काम केले आहे. त्यानंतर 2011 मध्ये नाशिकमध्ये उपायुक्त म्हणून चंद्रकांत गुडेवार यांना संधी मिळाली. त्यानंतर ते सोलापूरला महापालिका आयुक्त म्हणून आले होते.

Chandrakant Gudewar
Ambadas Danve : फडणवीस हेच मराठाविरोधी भूमिका घेतात; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

सोलापुरातून त्यांची बदली अमरावतीमध्ये झाली. सहायक आयुक्त म्हणून विभागात बदली झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गुडेवारी यांनी सांगलीत कारकिर्द गाजवली. त्या वेळी महाविका आघाडीचे सरकार सत्तेवर होते. संभाजीनगर आणि नाशिकचे विभागीय सहायक आयुक्त म्हणून काम केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com