Congress Vs BJP : सुरेशभाऊंचा गौप्यस्फोट... खुलासा देता-देता मिरज काँग्रेस शहराध्यक्षांच्या नाकीनऊ

Suresh Khade Vs Sanjay Mendhe : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संजय मेंढे यांचे नाव घेऊन भाजप आमदार सुरेश खाडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर काँग्रेसच्या बैठकीत हा मुद्दा चांगलाच तापला.
BJP MLA Suresh Khade
BJP MLA Suresh Khade Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : मिरजचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक संजय मेंढे यांनी मागील चार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवून मला मदत केली, असा गौप्यस्फोट खुद्द भाजप आमदार सुरेश खाडे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर आपल्यावरील संशयाचे मळभ दूर करण्यासाठी मेंढे यांची चांगलीच कसरत सुरु आहे. मेंढे यांनी खाडे यांचा दावा खोडून काढत आपण काँग्रेस सोबतच असल्याचे म्हटलं आहे.

खाडे यांचा दाव्यावर खुलासा करण्यासाठी मेंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष योगेश जाधव, युवक काँग्रेसचे विनायक मेंढे उपस्थित होते. खाडे बोलले म्हणून आम्ही त्यांचे काम केले असे होत नाही. यापूर्वीही खाडे यांनी विरोधी उमेदवार मीच निवडतो, असे सांगत दावा केला होता. पण काय झालं? माझा पक्ष आणि त्यांचा पक्ष वेगळा असून मी काँग्रेसबरोबरच आहे. मी त्यांना निवडणुकीत मदत केली या दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण मेंढे यांनी दिले आहे.

तसेच सुरेश खाडे यांनी त्या कार्यक्रमामध्ये केलेले वक्तव्य हे गमतीने केले होते. ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते भाजपचे आमदार आहेत. मात्र विकास कामांच्या निधीसाठी त्यांच्याकडे पाठपुरावा काँग्रेसचे असूनही आम्हाला करावा लागतो. त्यांनीही पक्ष भेद न ठेवता यापूर्वीही विकास कामांसाठी निधी दिला आहे. जिल्ह्याचे विद्यमान खासदार विशाल पाटीलही तशी मदत करतात. यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य नाही.

BJP MLA Suresh Khade
BJP Vs Congress : काँग्रेस म्हणजे ‘पीडब्ल्यूसी’; सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या काँग्रेससह चन्नींवर भाजपची बोचरी टीका

मिरज येथील एका भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान आमदार खाडे यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मेंढे यांनी त्यांचा पक्ष बाजूला ठेवत आपल्याला मदत केल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी बापू हे भाऊबरोबर असावेत असे सर्वांनाच वाटतं असल्याचेही म्हणाले होते. यानंतर आता काँग्रेसमध्ये यावरून वाद सुरू झाला असून आगामी स्थानिकच्या तोंडावर काँग्रेसमधील कलह उफाळून बाहेर येताना दिसत आहे.

त्यांच्यावर विश्वास होता : तानाजी सातपुते

मेंढे यांनी विधानसभा निवडणुकीचा दाखला देताना महाविकास आघाडीचे तानाजी सातपुते यांना 467 मतांचे लीड दिल्याचा दावा केला आहे. पण त्यांच्या भुमिकेवर शिवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी याआधीच आपले स्पष्टीकरण देताना, आमची काँग्रेससोबत युती असल्याने काही बोलता येत नाही. पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्यांनी मला मदत केली नसली तरीही जनतेने सहकार्य केल्याचे ते म्हणाले होते.

काँग्रेसच्या बैठकीतही वाद

काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय मेंढे हे मिरजेत शिवसेनेच्या व सांगलीत अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात होते. त्यांनी सांगलीत अपक्ष उमेदवाराचा प्रचार केल्याचा मुद्दा मिरजेत काही दिवसापूर्वी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीतही समोर आला होता. त्यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात आणि मेंढे यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यानंतरच मिरजेत आ. खाडे यांनी केलेल्या दाव्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकांऱ्यात खळबळ उडाली होती.

BJP MLA Suresh Khade
Congress Vs BJP : मोदींवरील ‘गायब’ पोस्टवरून घमासान; पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी डिवचलं, भाजपने काँग्रेसला झोडले

भाजपला केवळ 900 मताधिक्य

मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी नेत्यांनी बदल घडविण्याचा निर्धार केला होता. तो लोकसभेवेळी विशाल पाटील यांच्यामुळे साध्य झाला. कारण त्यांनी निकालानंतर काँग्रेसला पाठिंबा दिला. मात्र विधानसभेवेळी त्यांचा हा डाव उघळल्याचे खाडे यांच्या वक्तव्यामुळे आता समोर आले आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या मित्र पक्षांनी काँग्रेस नेत्यांवर विश्वास ठेवला. पण आता नेहमीप्रमाणे दगाफटका झाल्याचेच समोर आले आहे. नेत्यांनी विरोधकाशी हात मिळवणी केली. पण कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केल्याने शहरात भाजपला केवळ 900 मताधिक्य मिळाल्याचे आता समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com