Laxman Dhoble ; माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंवर भाजप सोडण्याचा समर्थकांचा दबाव; काय आहे कारण?

Bahujan Ryat Parishad : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आपली अख्खी हयात शरद पवार यांच्यासोबत घालवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनही त्यांनी शरद पवारांना साथ दिली होती.
Laxman Dhoble
Laxman DhobleSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 14 October : सुमारे दहा वर्षांपूर्वी भाजपवासी झालेले माजी मंत्री तथा पक्ष प्रवक्ते प्रा. लक्ष्मण ढोबळे यांना पक्षात सातत्याने डावलले जात आहे, त्यामुळे ढोबळे यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडावे, असा दबाव बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर आणला जात आहे. आता ढोबळे खरंच भाजप सोडणार की एखाद्या पदासाठी दबाव तंत्र वापरत आहेत, अशी कुजबूज आता सुरू झाली आहे.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आपली अख्खी हयात शरद पवार यांच्यासोबत घालवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनही त्यांनी शरद पवारांना साथ दिली होती. मात्र, दहा वर्षांपूर्वी त्यांनी भाजपत प्रवेश केला होता.

भाजपने (BJP) त्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र, भाजपमध्ये सातत्याने डावलले जात आहे. तसेच, प्रमुख कार्यक्रमाला त्यांना बोलावले जात नाही, त्यामुळे ढोबळे यांची भाजपमध्ये अवहेलना होत आहे, असा आरोप त्यांच्या नियंत्रणात असलेल्या बहुजन रयत परिषदेकडून केला जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble ) यांच्यावर राजकीय हेतूने वेगवेगळे आरोप करून त्यांना राजकारणातून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज (ता. 14 ऑक्टोबर) मंगळवेढा येथील ढोबळे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रवक्तेपदासह सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत त्यांच्यावर दबाव निर्माण केला. या वेळी ढोबळे यांनी निर्णयासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात ढोबळेंचा शाहू परिवार मोठा आहे. याशिवाय त्यांना समाजदेखील आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मागणीकडे भाजपचे नेतेमंडळी कसे पाहतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Laxman Dhoble
Vinay Sahasrabuddhe : महायुतीकडून निष्ठावंतांना न्याय; शिंदे, पवारांनंतर भाजपतील ज्येष्ठांना मंत्रिपदाचा दर्जा

बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड कोमल ढोबळे, याशिवाय बंडू पवार (सोलापूर), सुरज मुजावर (सातारा), सचिन ऐवळे (अकोला), सचिन खडसे (यवतमाळ) उमेश धुंडे (गोंदिया), अजय डोंगरे (वर्धा) योगेश येडाळे (धाराशिव), सुनील भालेराव (जालना), साहेबराव गुंडले (नांदेड), अजय वाघमारे (परभणी), श्यामभाऊ चव्हाण (लातूर), राजू थोरात (नाशिक), बापूसाहेब गायकवाड (अहिल्यानगर), गणेश साठे (नंदुरबार), विनोद हातगडे (बीड), मीना धावारे (धाराशिव) प्रकाश खंदारे, संभाजी हेगडे आदींसह बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते

भाजपने विचार न केल्यास वेगळा निर्णय : कोमल ढोबळे

भाजपने प्रवक्तेपदाची जबाबदारी दिल्यानंतर पक्षाकडून कार्यक्रमाबाबत विचारणा किंबहुना विश्वासात घेतले जात नाही. पक्षाच्या कार्यक्रमातही डावलले जात आहे, त्यामुळे सध्या त्यांची पक्षाला गरज उरली नसावी; म्हणून त्यांना डावलले जात असावे. लोकसभेच्या पाच राखीव जागेवर संधी देण्याची मागणी केली होती. मात्र, पक्षाने त्याबाबत विचार केला नाही.

Laxman Dhoble
Ajit Pawar NCP : अजितदादांचा भरणे, राजन पाटलांना ‘बूस्टर डोस’; मंत्रिमंडळ बैठकीत ‘गेम चेंजर’ प्रकल्पाला मंजुरी

विधानसभेच्या 29 जागा राखीव आहेत. विधानसभेला आमचा विचार न झाल्यास आम्हाला वेगळा निर्णय करावा लागेल. ढोबळेंचे राजकीय करिअर उद्‌ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडावे, यासाठी आम्ही मागणी केली आहे, असे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमल ढोबळे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com