

कोल्हापूर महानगरपालिकेतील विविध नागरी प्रश्नांवर आमदार सतेज पाटील यांनी ‘कोल्हापूर फाइल्स’ सादर करत महायुतीवर जबाबदारी टाकली.
महायुतीकडून काँग्रेसवर विकास रखडवल्याचे आरोप होत असताना, सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रत्यारोप केला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेत गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे शहराचा विकास रखडलेला आहे अशी नेहमीच सत्तेची खुर्ची दाखवत काँग्रेस विरोधात टीमकी वाजवणाऱ्या महायुतीला आज काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर फाइल्स काढत महायुतीचा पंचनामा जाहीर केला. यावेळी शहराच्या विविध प्रश्नाचा पंचनामा करत त्यांनी महायुतीला जबाबदार धरले आहे. आज कोल्हापूर काँग्रेस कमिटीमध्ये पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी हा पंचनामा उघड केला.
कोल्हापूरात महापालिका प्रशासकामार्फत महायुतीने केलेल्या बोगस कामगिरीचा पंचनामा केला. कोल्हापूरची वाताहत झाली याला जबाबदार महायुती सरकार आहे. 100 कोटींच्या रस्त्यामधील एकही रस्ता पूर्ण नाही. मुख्यमंत्री आले की एका रात्रीत रस्ता होतो. महायुतीच्या कारभाराचा पंचनामा आम्ही जनतेसमोर मांडत आहे, असे आमदार पाटील म्हणाले.
राज्यात महायुतीचेच उमेदवार बिनविरोध कसे निवडून येतात.पैशाचा वारेमाप वापर होत आहे. निवडणूक आयोगाने याची निप:क्षपातीपने चौकशी करावी. महायुतीकडून दबावाचं, पैशाचं राजकारण सुरू आहे. आजच निवडणूक आयोगाने बिनविरोध निवडणूक झाल्या आहेत. याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करावी. अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली.
राहुल आवाडे बच्चा...
इचलकरंजीचे भाजप नेते आणि आमदार राहुल आवाडे यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर आमदार पाटील यांनी राहुल आवाडे अभी तो बच्चा है, अजून लहान आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरांना तीन वर्षांत काय दिलं. याच उत्तर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी दिलं पाहिजे.
...तर धनंजय महाडिकांचा कार्यक्रम झाला नसता
कोल्हापुरात काँग्रेसच्या चार ते पाच गाणी उमेदवार निवडून येतील असे विधान खासदार धनंजय महाडिक यांनी केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार सतेज पाटील यांनी सडाडून टीका केली आहे. खासदार धनंजय महाडिक काय बोलतात याच तारतम्य पाहिजे.
धनंजय महाडिक यांनी कोणत्या विषयावर बोलतायं याचं ज्ञान आत्मसात करावं. धनंजय महाडिक यांनी सांगून जनता ऐकत असती तर महाडिकांचा 2 लाख 70 हजार मतानं कार्यक्रम झाला नसता. असा सवाल टोला आमदार महाडिक यांनी लगावला.
राष्ट्रवादी भाजपची बी टीम
जनसुराज्य आणि राष्ट्रवादी भाजपचीच बी टीम आहे. कोल्हापूरकारंची धास्ती घेतल्याने महायुती झाली.कोल्हापूरात महापालिका निवडणूक महायुती विरुद्ध कोल्हापूरकर अशी होणार आहे.
Q1. ‘कोल्हापूर फाइल्स’ म्हणजे काय?
➡️ कोल्हापूर शहरातील विकासाशी संबंधित प्रश्नांचा पंचनामा सतेज पाटील यांनी ‘कोल्हापूर फाइल्स’ या नावाने मांडला आहे.
Q2. सतेज पाटील यांनी कोणावर आरोप केले?
➡️ त्यांनी महायुतीला शहरातील विविध समस्या आणि विकास रखडण्यास जबाबदार धरले आहे.
Q3. ही माहिती कुठे जाहीर करण्यात आली?
➡️ कोल्हापूर काँग्रेस कमिटीच्या पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर करण्यात आली.
Q4. महायुतीचा मुख्य दावा काय होता?
➡️ गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस सत्तेत असल्याने शहराचा विकास रखडल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत होता.
Q5. या आरोपांचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
➡️ आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.