maharashtra politics : ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? महाविकास आघाडीच्या भवितव्यावर रमेश चेन्नीथालांचे मोठे विधान

Congress On Thackeray Brothers Alliance : राज्यात नव्या युतीला प्रारंभ झाला असून या युतीमुळे महाविकास आघाडी ठिकणार का? मनसे-शिवसेना युती काँग्रेसला मान्य आहे का? असे प्रश्न सत्ताधाऱ्यांकडून विचारले जात होते. यावर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
Raj Thackeray And Uddhav Thackeray
Raj Thackeray And Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत सकारात्मक मत व्यक्त केले.

  2. त्यांनी सांगितले की, अंतिम निर्णय चर्चा व विचारमंथनातूनच घेतला जाईल.

  3. महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे.

Pune News : पुणे येथे काँग्रेसच्या नवनिर्मित कार्यकारणीच्या दोन दिवसीय चिंतन बैठकीदरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. चेन्नीथाला या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला ग्रीन सिग्नल मिळालाय का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. (Congress Maharashtra in-charge Ramesh Chennithala says party open to Thackeray brothers alliance and discusses Maha Vikas Aghadi’s political future)

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना चेन्नीथाला यांनी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. चेन्नीथाला म्हणाले, भाजप आणि निवडणूक आयोग मिळून लोकशाही संपवत आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामधील निवडणुकांमध्ये मतदार यादीत घोळ घालून काँग्रेसचा विजय हिसकावला. सध्या बिहारमध्येही मतदार यादीत गडबड सुरू आहे. काँग्रेसने याबाबत याचिका दाखल केली होती, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
Raj-uddhav Thackeray brothers alliance : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मविआचे काय होणार? माजी मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

निवडणूक आयोग भाजपला वाचवत आहे. तसेच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असता त्यांना नोटीस पाठवून घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रमेश चेन्नीथाला म्हणाले, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस देशातील लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहे. "आम्ही हे इंडिया आघाडीसाठी नव्हे, तर देशाला वाचवण्यासाठी करत आहोत. यासंदर्भात काँग्रेसने राज्यात प्रत्येक घरात सही संकलन अभियान सुरू केले आहे,

चेन्नीथाला म्हणाले, सध्याचे राज्य सरकार भ्रष्टाचाराने ग्रस्त आहे आणि देशात यापेक्षा जास्त भ्रष्ट सरकार कधीच नव्हते. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हजारो महिलांना यातून वगळल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत बोलताना चेन्नीथाला यांनी सकारात्मक भूमिका मांडली. ते म्हणाले, "दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काही अडचण नाही. मात्र, युतीबाबत अंतिम निर्णय चर्चेतून घेतला जाईल." याशिवाय, त्यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही भाष्य केले आणि आघाडीच्या भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी काँग्रेस पक्ष विचारमंथन करत असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
Thackeray brothers political strategy : राज ठाकरे मातोश्रीवर जाताच महायुतीचे नेते अलर्ट: गणेशोत्सव, दहीहंडीचं निमित्त साधत 'प्लॅन बी' तयार

FAQs :

प्र.१: काँग्रेस ठाकरे बंधूंच्या युतीला समर्थन देईल का?
उ: रमेश चेन्नीथाला यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली असून अंतिम निर्णय चर्चेतून घेतला जाईल.

प्र.२: महाविकास आघाडीबाबत काँग्रेस काय विचार करत आहे?
उ: काँग्रेस पक्ष आघाडीच्या भविष्यातील दिशेबाबत विचारमंथन करत आहे.

प्र.३: ठाकरे बंधू कोण आहेत?
उ: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे राजकीय नेते आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com