Mumbai News : हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची पावले आता येत्या काळात राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याकडे पडत आहेत. वरळीतील विजयी मेळाव्यात 20 वर्षानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यानंतर रविवारी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहा वर्षानंतर मातोश्रीवर जात राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू युती करतील, अशा चर्चाना वेग आला आहे.
मनसे-उद्धव ठाकरे यांची शिवसेना भविष्यात एकत्र येणार नाहीत, असा कयास महायुतीचा होता. मात्र, एकाच महिन्यात दोन वेळा ठाकरे बंधू एकत्र आल्याने आता त्यांच्यात युतीबाबत पडद्यामागे हालचाली दिसत आहेत. त्यामुळेच आता महायुतीनेही ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांचा मुकाबला करण्यासाठी बी प्लॅन तयार ठेवला असून त्यानुसार येत्या काळात रणनीती आखली जात आहे.
मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत असतनाच ठाकरे बंधुंमध्ये ही जवळीक वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष सावधपणे पावले टाकत आहे. येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार केला आहे. त्यामुळेच महायुतीने आता मुंबईसह प्रमुख महापालिका महायुती एकत्र लढणार असल्याचे समजते. महायुतीमध्ये फूट पडली तर त्याचा फायदा ठाकरे बंधूला होणार असल्याने येत्या काळात महायुतीने कुठलीच रिस्क घ्यायचे नाही, असे ठरवले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा रविवारी वाढदिवस पार पडला. या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा पुन्हा वेगाने सुरू झाली आहे. त्याच मुळे आता महायुतीने तयारी सुरु केली आहे. येत्या काळात दहिहंडी व गणेशोत्सव होत असून त्यानिमित्त महायुतीने सणा-सुदीच्या काळात जनतेपर्यंत पोहोचण्याचे प्लॅनींग केले असून त्याचा फायदा येत्या काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीत होणार आहे.
ठाकरेंना बंधू एकत्र लढल्यास त्याचा फायदा होऊ नये, यासाठी महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळेच या तीन पक्षात असलेले वाद महिन्याभरात मिटवून तयारीला सुरूवात केली जाणार आहे. महायुती (Mahayuti) एकत्रित लढल्यास फरक पडणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे प्लॅनिंग केले जात आहे.
महायुतीने सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. ऐन सणा-सुदीच्या काळात मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मुंबईतील महानगरपालिका निवडणुकीसाठी वॉर्डची जबाबदारी महायुतीच्या आमदारांकडे देण्यात येणार आहे. त्यानुसार आतापासूनच गोविंदा पथक, गणेशोत्सव मंडळांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या जोडलेल्या कार्यकर्त्यांचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणात महानगरपालिका निवडणुकीत होणार आहे, त्यामुळेच आता महायुतीने प्लॅनिंगमध्ये काहीसा बदल केला आहे.
मुंबई महापलिका निवडणुका तोंडावर असतानाच येत्या काळात राज व उद्धव ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची शक्यता मराठी अस्मितेची भावना उभारण्यासाठी निश्चितच प्रभावी ठरू शकते. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काही समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्रित लढल्यास त्यांच्या युतीला फायदा होऊ शकतो.
दुसरीकडे महायुती सरकारकडून मुंबई महापालिका ताब्यात मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीवरून उद्भवलेल्या संघटित विरोध मोडून काढण्यासाठी रणनीती आखली जात आहे. त्यासोबतच केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना नागरिकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न असणार आहे. स्थानिक समन्वय, त्यासोबतच सरकारचे फायदे थेट नागिरकापर्यंत पोहचवणे, अशास्वरुपाचा बी प्लॅन महायुतीच्या रणनीतीचा भाग असू शकतो. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.