Raj-uddhav Thackeray brothers alliance : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मविआचे काय होणार? माजी मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

MVA future politics News : येत्या काळात मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची युती झाली तर महाविकास आघाडीचे काय होणार असा प्रश्न काही जणांना सतावत असतानाच या प्रश्नाचे उत्तर माजी मुख्यमंत्र्यांने दिले आहे.
Raj Thackeray | Uddhav Thackeray
Raj Thackeray | Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व महायुतीचे काय होणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे. त्यातच गेल्या महिन्यात राज व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामुळे ते राजकीयदृष्ट्या कधी एकत्र येणार याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची युती झाली तर महाविकास आघाडीचे काय होणार असा प्रश्न काही जणांना सतावत असतानाच या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे.

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज व उद्धव ठाकरे बंधू युती करू शकतात, त्यामुळे या संभाव्य युतीनंतर आता महाविकास आघाडीचे काय होणार? असा प्रश्न कशी जणांना सतावत असताना, त्याचे उत्तर माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj chavan) यांनी दिले आहे. येत्या काळात आमची आघाडी ही कायम असेल. पण एखाद्या पक्षाने पोटआघाडी केली तर तो त्यांचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Shiv Sena symbol dispute : राष्ट्रपतींमुळे शिंदे काही दिवस तरी निवांत झाले... ठाकरेंचे 'उम्मीद पे दुनिया कायम है...'

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यात महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती झाली तर महाविकास आघाडीची काय स्थिती असेल? अशा आशयाचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, आमची आघाडी ही राष्ट्रीय आघाडी आहे. ती कायम राहील. इंडिया आघाडीच्या एखाद्या घटकपक्षाने निवडणुकीसाठी अन्य पक्षाशी युती केली तर तो त्यांचा अधिकार आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
NCP SP News : "गद्दारी केलेल्या एक एकाला घरी पाठवणार"; अ‍ॅक्टिव्ह होताच शरद पवारांची वाघिण कडाडली!

भविष्यात काय होणार?

काँग्रेसची आघाडी ही उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षांसोबत आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. त्या पक्षांनी एखाद्या पक्षाशी पोटआघाडी केली किंवा आपल्या जागांपैकी इतर कोणाला दिल्या तर तो त्यांचा विषय आहे, असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्यासोबतच पृथ्वीराज चव्हाण यांनी पोटआघाड्या करणे हा ज्या-त्या पक्षाचा अधिकार असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'शेकाप'चा मेळावा 'मराठी'च्या मुद्द्यावर गाजवला,जयंत पाटलांनाही काढला चिमटा; म्हणाले...

सर्वच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न

राज व उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेच तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बदलणार आहे. त्यामुळे राज्यात विरोधकांची महाविकास आघाडी कायम राहील का? महाविकास आघाडी कायम राहिली तर त्यात राज ठाकरेंना स्थान असेल का? स्थानिक स्वराज्य संस्थेत जागावाटप नेमके कसे केले जाईल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या सर्वच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी केला.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Eknath Shinde pressure : कोकाटेंचं खातं बदलताच शिंदेंवर प्रेशर वाढलं : गोगावले, शिरसाट, कदमांवर राहणार मुख्यमंत्र्यांचं लक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com