
Pune : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपाचा प्रमुख चेहरा आहेत. त्यांचा राज्याच्या राजकारणासह केंद्रीय पातळीवर मोठं वजन असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. याचदरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी भावी मुख्यमंत्री नाही तर तुम्ही आता भावी पंतप्रधान व्हायला हवं अशी मागणी करण्यात आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
पुण्यातील शिवाजीनगर येथे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात आयोजकांनी देवेंद्रजी, आता भावी मुख्यमंत्री नको भावी पाच आकडी शब्द! भावी पंतप्रधान असं विधान केलं. त्या विधानानंतर फडणवीस यांनी केलेली कृती चर्चेचा विषय ठरली.
मॉडर्न कॉलेजच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक गजानन एकबोटे यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आयोजक एकबोटेंनी देवेंद्रजी, आता भावी मुख्यमंत्री नको भावी पाच आकडी शब्द! भावी पंतप्रधान(PM) असं विधान केलं. यानंतर फडणवीस यांनी मान डोलवली आणि हात जोडले.
यावर आयोजक एकबोटे म्हणाले, '' तुम्ही नाहीच म्हणाल. मात्र, भावी पंतप्रधान शब्द उच्चारताच सभागृहात किती टाळ्या वाजत आहेत त्यावरुन हे लक्षात येत आहे.
फडणवीस काय म्हणाले ?
आपण नवीन शिक्षण धोरण आणलं असून येत्या काळात शिक्षण पद्धतीत मोठे बदल झालेले बघायला मिळतील आणि जग वेगाने बदलतं आहे, पुढच्या बारा वर्षात आणखी गोष्टी बदललेल्या असतील असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आता मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान व्हावं...
महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi) चं सरकार कोसळल्यानंतर भाजपा शिवसेना युतीचं सरकार सत्तेत आले. यानंतर फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील असं अनेकांना वाटलं होतं. मात्र, फडणवीसांनीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. पण आजही त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही भाजपा नेत्यांची मनोमन इच्छा आहे.
एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस हे केंद्रातही उत्तम काम करु शकतील असा विश्वासही त्यांच्या समर्थकांना आहे. पण आता त्यांनी मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान व्हावं अशी इच्छा व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.