Ajit Pawar : "मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजितदादांच्या मनातलं पुन्हा एकदा आलं ओठांवर

Ajit Pawar Statement : राज्याचं मुख्यमंत्री बनण्याचं अनेक राजकीय नेत्यांचं स्वप्न असतं. अजित पवार हे यापैकी एक आहेत. त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्री पद सर्वाधिक वेळा भुषवलं आहे. मात्र, अद्याप त्यांना मुख्यमंत्रि‍पदाचा मान मिळालेला नाही. याची सल त्यांच्याही मनात आहे. शिवाय ते अनेकदा त्यांनी ती बोलून देखील दाखवली आहे.
Ajit Pawar 1
Ajit Pawar 1sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 03 May : "मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमतंय. कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही", असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे दादांना अजून मुख्यमंत्रि‍पदाची खुर्ची खुनावत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

राज्याचं मुख्यमंत्री बनण्याचं अनेक राजकीय नेत्यांचं स्वप्न असतं. अजित पवार हे यापैकी एक आहेत. त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्री पद सर्वाधिक वेळा भुषवलं आहे. मात्र, अद्याप त्यांना मुख्यमंत्रि‍पदाचा मान मिळालेला नाही. याची सल त्यांच्याही मनात आहे. शिवाय ते अनेकदा त्यांनी ती बोलून देखील दाखवली आहे.

असंच त्यांनी आता पुन्हा एकदा मला मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 मे ते 4 मे दरम्यान मुंबईतील वरळी येथे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं हे आयोजन करण्यात आलं आहे.

Ajit Pawar 1
Ajit Pawar : अजितदादांनी चंदगडच्या कार्यक्रमात फेटा बांधून घेतला नाही; म्हणाले, ‘माझा उजवा हात येथे पराभूत झालाय...’

या महोत्सवातील दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या एका वक्तव्यावर भाष्य करताना अजित पवारांनी आता मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं पण योग कुठं आलाय, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, "महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे, असे राही भिडे म्हणाल्या. आपल्याला सगळ्यांना तसं वाटत असतं पण शेवटी मात्र योग पण जुळून यावा लागतो. आता मलाही वाटत मी मुख्यमंत्री व्हावं कुठं जमतंय. कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही."

Ajit Pawar 1
Ram Shinde Vs Rohit Pawar : आमदार पवार शांत बसणाऱ्यांमधील नव्हे! कर्जतमधील सत्तांतर सभापती राम शिंदेंना बोनस?

तर जसं ममता बॅनर्जी झाल्या, जयललिता यांनी स्वत:च्या ताकदीवर तामिळनाडूत अनेकदा राज्य त्यांनी मिळवलेलं बघितलं. कित्येक महिलांची नावं देशातील वेगवेगळ्या राज्यात मुख्यमंत्री झालेली घेता येतील. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथंही ते होईल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाई माता, ताराराणींचा हा महाराष्ट्र आहे. या सर्व महिला आपल्या राज्याला मिळाल्या, त्यांचं कर्तृत्व महिलांनी बघितलंय, त्यामुळं तो दिवस फार लांब असेल, असं मला वाटत नाही, असंही अजितदादा यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com