Solapur Lok Sabha constituency
Solapur Lok Sabha constituencySarkarnama

Solapur Lok Sabha : सोलापुरात 12 तासांत वाढलेल्या मतांवर काँग्रेसचा संशय; प्रशासनाकडे मागितली 34 हजार मतांची माहिती

Lok Sabha Election 2024 : सात तारखेला सायंकाळी जाहीर झालेली आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आकडेवारी यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. या दोन्हीमध्ये तब्बल 34 हजार 986 मतांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यावर काँग्रेस पक्षाकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Published on

Solapur, 12 May : सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी (ता. 7 मे) सायंकाळी जाहीर झालेली मते आणि दुसऱ्या दिवशी जाहीर झालेली मते यांमध्ये मोठा फरक दिसून येत आहे. बारा तासांत 34 हजार 986 मते कशी वाढली, असा संशय व्यक्त करत काँग्रेस पक्षाने सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहानंतर ज्या बूथवर मतदान सुरू होते, त्या बूथची नावे आणि त्या बूथवरील सीसीटीव्ही फुटेज द्यावेत, अशी मागणी केली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी (Solapur Lok Sabha constituency) मंगळवारी (ता. 7 मे) मतदान झाले. मतदान सायंकाळी सहापर्यंत होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मतदानाची प्राथमिक आकडेवारी जाहीर केली. पण, सात तारखेला सायंकाळी जाहीर झालेली आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आकडेवारी यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. या दोन्हीमध्ये तब्बल 34 हजार 986 मतांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यावर काँग्रेस पक्षाकडून (Congress) संशय व्यक्त करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Solapur Lok Sabha constituency
Beed Lok Sabha : पंकजा मुंडेंसाठी मोदी, गडकरी, अजितदादांची बॅटिंग; पण फडणवीस बीडकडे फिरकलेच नाहीत!

सोलापूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या बूथनिहाय मतांची आकडेवारी आम्हाला द्यावी अशी मागणी काँग्रेसने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. काँग्रेसच्या उमेदवार तथा आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी स्वतः जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन केला होता. त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील बूथनिहाय आकडेवारी जिल्हा प्रशासनाने शनिवारी काँग्रेस दिली आहे. दरम्यान, उमेदवार जाहीर करण्यापासून प्रचारापर्यंत आणि झालेले मतदान व आकडेवारी याबाबत काँग्रेस पक्ष दक्ष झाल्याचे दिसून आले.

प्रशासनाच्या आकडेवारीवर समाधान न झाल्याने काँग्रेसने प्रशासनाकडे नवी मागणी केली आहे. मतदानाच्या दिवशी 7 मे रोजी सायंकाळी सहानंतर ज्या केंद्रावर मतदान सुरू होते, त्या केंद्रांची नावे आणि केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी केली आहे. मात्र, काही अधिकारी बाहेरगावी गेले आहेत, त्यामुळे काँग्रेसला सहानंतरचे सीसीटीव्ही फुटेज मिळू शकलेले नाही. सीसीटीव्ही मिळाल्यानंतर काँग्रेसची काय भूमिका असणार, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. वाढलेल्या मतांचे काय होणार, याची उत्सुकता आहे.

Solapur Lok Sabha constituency
Lok Sabha Election 2024 : 'फोर्टी प्लस' ही घोषणा भाजपची की नाना पटोले यांची?

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील बूथनिहाय मतांची आकडेवारी आम्हाला मिळाली आहे. पण आम्ही मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहिती आम्ही मागवली आहे. येत्या दोन दिवसांत ती उपलब्ध करून देण्यात, असे जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला सांगण्यात आले आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

Solapur Lok Sabha constituency
Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंची अखेरची फडफड; लोकसभेनंतर त्यांचे राजकारण संपणार : शिवसेना नेत्याचे भाकीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com