Madha : सुनेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे माजी आमदार उतरले मैदानात; सहकुटुंब भेटले शरद पवारांना

Dhanaji Sathe Meet Sharad Pawar : माजी आमदार धनाजी साठे हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे मित्र होते. मुख्यमंत्री असतानाच देशमुख यांनी मित्राला विधान परिषदेवर घेत आमदार केले होते.
Sathe Family Meet Sharad Pawar
Sathe Family Meet Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 15 October : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासमोर माढ्यातील विधानसभा उमेदवार निवडण्याचा पेच समोर असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार धनाजी साठे, माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे आणि काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे यांनी शरद पवार यांची आज पुन्हा भेट घेतली आहे. मीनल साठे यांनी यापूर्वी पवारांची दोन वेळा भेट घेतली आहे. माढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक इच्छुक असताना सत्ता काँग्रेसच्या नेत्यांनीही पवारांची भेट घेतल्याने माढ्याच्या उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे.

माढा विधानसभा मतदारसंघासाठी (Madha Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे, संजय कोकाटे, शिवाजी कांबळे, संजय पाटील घाटणेकर, बाळासाहेब पाटील, नितीन कापसे यांनी मुलाखत दिली आहे. त्याचबरोबर माढ्याच्या काॅंग्रेसच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांनीही मुलाखत दिली आहे.

भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील हे माढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, त्याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. पण, महाविकास आघाडीकडून ते विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा दबक्या आवाजात आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदार संघ कोणाला सुटतो, यावर उमेदवारीचे पुढील गणित अवलंबून आहे.

माढ्यातून सुनेला उमेदवारी मिळावी, यासाठी माजी आमदार धनाजीराव साठे (Dhanajirao Sathe) हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी सहकुटुंब जाऊन शरद पवार यांची भेट घेत माढ्यातून सूनबाई मीनल साठे यांना उमेदवारी मिळावी, अशी विनंती त्यांनी शरद पवार यांना केली आहे. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार की काँग्रेसमध्येच राहून निवडणूक लढवणार हे पाहावे लागेल.

Sathe Family Meet Sharad Pawar
Vidhansabha Election 2024 : फडणवीस म्हणतात ‘महाराष्ट्र तुमच्या आशीर्वादाची अन्‌ भक्कम जनादेशाची वाट बघतोय...’

माजी आमदार धनाजी साठे हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे मित्र होते. मुख्यमंत्री असतानाच देशमुख यांनी मित्राला विधान परिषदेवर घेत आमदार केले होते. ते धनाजी साठे आता सुनेला आमदार करण्यासाठी सक्रीय झाले आहेत.

आमदार बबनराव शिंदे हे मुलगा रणजितसिंह शिंदे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी कामाला लागले आहेत. त्यासाठी त्यांनी तीन वेळा शरद पवार यांची भेट घेतली आहे. मात्र, शरद पवार यांच्याकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा शब्द मिळालेला नाही. तुतारी चिन्हावर रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढवतील. तुतारी चिन्ह न मिळाल्यास रणजितसिंह शिंदे यांनी माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे.

Sathe Family Meet Sharad Pawar
Deepak Salunkhe : अजित पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखेंनीच पक्ष सोडला

बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनीही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे माढ्यातून शरद पवार नेमके कोणाला तिकिट देणार आणि निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण राहणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com