Solapur Politics: 'केसीआर' यांची भेट घेतलेल्या भालकेंशी राष्ट्रवादीचा संपर्क; निर्णयाची घाई नको असा दिला सल्ला !

Bhagirath Bhalke News : 'केसीआर' यांनी भालके यांच्यासाठी सोलापूरमध्ये खास विमान पाठवले होते...
Bhagirath Bhalke, Sharad Pawar
Bhagirath Bhalke, Sharad PawarSarkarnama

Solapur : पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे बीआरएसच्या संपर्कात आहेत. भालके यांनी बुधवारी(दि.७) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर भालके यांच्या बीआरएस प्रवेशाबाबतच्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान, आता राष्ट्रवादीकडून भालके आणि केसीआर यांच्या भेटीची दखल घेतली असून लवकरच पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींनी त्यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके होते. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, आता भालके (Bhagirath Bhalke) हे २०२४ मध्ये भारत राष्ट्र समिती या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र, राव यांच्या भेटीनंतर भालके यांनी महत्वाचं विधान करताना मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Bhagirath Bhalke, Sharad Pawar
BRS News : २८८ मतदारसंघांमध्ये बीआरएसचे काम सुरू, तेलंगणा फॉर्म्यूला महाराष्ट्रात वापरणार!

केसीआर(KCR) यांनी भालके यांच्यासाठी सोलापूरमध्ये खास विमान पाठवले होते. याच विमानातून आता ते हैद्राबादमध्ये दाखल झाले होते.त्यांनी मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजीत पाटलांना पक्षात घेतल्यानं भगीरथ भालके नाराज आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे भालके यांनी दुसऱ्या राजकीय पक्षांची चाचपणी करण्यास सुरु केली आहे.

आता राष्ट्रवादीकडून भालके यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. बीआरएस पक्ष प्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी वरिष्ठांनी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच कोणताही निर्णय घेऊ नका अशी सूचना देखील केली आहे. मात्र, केसीराव यांची भेट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर भालके हे त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Bhagirath Bhalke, Sharad Pawar
Beed Bjp News : म्हस्के लोकसभा निवडणूक प्रमुख, मुंडे, धसांवर विधानसभेची जबाबदारी...

भालके नेमकं काय म्हणाले होते?

भगीरथ भालके यांनी तेलगंणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.त्यानंतर मात्र, मी अजूनही भारत राष्ट्र समिती(BRS) मध्ये प्रवेश केलेला नसल्याचं त्यांनी महाराष्ट्रात परतल्यानंतर स्पष्ट केलं होतं. तसेच पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आणि विठ्ठल परिवारातील नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे. तत्पूर्वी आमचे (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं भालके म्हणाले होते.

Bhagirath Bhalke, Sharad Pawar
Pune News : 'पीएमओ'त सचिव असल्याचं सांगणाऱ्या तोतया 'आयएएस' अधिकाऱ्याने 42 लाखांना गंडविले

तीन पक्षांची ताकदीनंतरही पराभवाची नामुष्की...

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंढरपूरचे तत्कालीन आमदार भारत नाना भालकेंच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालकेंच्या मुलाला म्हणजेच भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली होती. मात्र, भगीरथ भालकेंना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपचे उमेदवार असलेल्या समाधान आवताडेंनी भालकेंना पराभूत करत विधानसभा गाठली. शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्षांची ताकद एकत्र असूनही भाजपने भालकेंना पराभूत केलं होतं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com