Madha Loksabha : मनोहर जोशींचं सरकार रामराजेंच्या कृपेनंच चाललं ; भाजप - अजित पवार गट वाद मिटेना...

Controversy between BJP and Ajit Pawar group : फलटण येथील पत्रकार परिषदेत खासदार रणजिंतसिंह नाईक - निंबाळकर यांनी रामराजे नाईक - निंबाळकरांना लगावले खोचक टोले.
Ramraje Naik - Nimbalkar, Ranjintsinh Naik - Nimbalkar
Ramraje Naik - Nimbalkar, Ranjintsinh Naik - NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Madha Loksabha : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि अजित पवार गटातील वाद आता मिटण्याऐवजी चिघळताना दिसत आहे. फलटण शहरात अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक - निंबाळकर यांच्या मेळाव्यातून भाजपाचे खासदार रणजिंतसिंह नाईक - निंबाळकर यांच्यावर लोकसभा उमेदवारीवरून टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर फलटण येथील पत्रकार परिषदेत खासदार नाईक यांनी रामराजेंवर खोचक टोले लगावले आहेत. (Controversy between BJP and Ajit Pawar group in Madha Loksabha)

महाराष्ट्रातील आख्खी धरणं रामराजेंनी बांधली असून मनोहर जोशीचं सरकार रामराजेंच्या कृपेनंच चाललं असा खोचक टोला खासदार रणजितसिंह यांनी लगावला आहे. रामराजे म्हणतात, रणजितसिंह यांना महत्त्व द्यायची गरज नाही. परंतु, सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यावरच बोलतात. फलटण तालुक्याचे नेते रामराजे नाईक - निंबाळकर ज्या शिक्षण संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत; त्याच शिक्षण संस्थेमध्ये माझे 'एसवाय'पर्यंतचे शिक्षण झाले असून तिथेच 'टीवाय'चे ॲडमिशन सुद्धा माझे आहे.

Ramraje Naik - Nimbalkar, Ranjintsinh Naik - Nimbalkar
Satara News: साताऱ्यात महायुती एकवटली, महाविकास आघाडीचे काय?

माझा डिप्लोमाही झाला आहे. परंतु, मी हुशार - तज्ञ नाही. या तालुक्यातील रामराजे हुशार आहेत. आख्या महाराष्ट्रातील धरण रामराजेंनी बांधली, त्यांच्याच कृपेने महाराष्ट्रातील मनोहर जोशींचे सरकार चाललं. युतीच्या काळात रामराजे कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष नसून राज्याचे मुख्यमंत्री होते, असं रामराजेंना म्हणायचं असेल तर त्याबाबत मला मत व्यक्त करायचं नाही, असा खोचक टोला खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी लगावला.

फलटण येथील लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर वारकरी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार रणजितसिंह यांची रामराजेंविरोधात जोरदार टोलेबाजी पहावयास मिळाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सगळी सत्ता रामराजेंच्या कुटुंबात

रामराजेंना सगळी सत्ता त्यांच्याच कुटुंबात राहावी, अशी इच्छा असेल तर त्याबाबत माझं काही मत नाही. त्यांचा एक भाऊ सभापती, एक भाऊ मार्केट कमिटीचा चेअरमन, वहिनी एकीकडे सत्तेत, मुलं सभापती, एका भावाकडे जिल्हा परिषद आणि त्याच भावाला लोकसभा द्यायची यावरही मला काही बोलायचं नाही, असेही खासदार रणजितसिंह म्हणाले.

ते म्हणाले, माझी शक्य तेवढी त्यांनी बदनामी करावी. माझ्या नावाचा जेवढा उजागर ते करत आहेत. तेवढा उजागर त्यांनी परमेश्वराचा केला, तर निश्चितपणे त्यांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल. कारण त्यांचा सकारात्मक विचार क्षीण झाला असून केवळ खासदारांना शिव्या देणे, हा एकमेव उद्योग त्यांच्याकडे राहिला आहे.

रामराजेंचे पत्रिकेत मुद्दाम नाव... 

रामराजे हे सर्व शक्तिमान नेते आहेत. त्यांच्या वक्तव्याला कुठे चॅलेंज करत बसता. साखर कारखाना उभा राहिला तर आठवे आश्चर्य, एमआयडीसी आणली तर आठवे आश्चर्य आणि खासदार झाले तर आठवे आश्चर्य म्हणाले होते. आता या सर्व गोष्टी त्यांनी बोलल्या आणि मी जनतेच्या जीवावर पूर्ण केल्या. नीरा - देवघर पाणी योजनेच्या कार्यक्रमासाठी पत्रिकेत रामराजेंच मी मुद्दाम नाव टाकायला लावलं होतं. फलटणला आलेलं पाणी त्यांना त्यांच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे अशी माझी इच्छा होती, असेही खासदार रणजितसिंह म्हणाले.

पंतप्रधान 19 फेब्रुवारीला माढा लोकसभा मतदार संघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला आदरणीय लक्ष्मणराव इनामदार जिहे - कटापूर पाणी योजनेच्या पूजनाला येणार आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवसन्मान पुरस्कारासाठी पंतप्रधानांना विनंती केली आहे. शिवसन्मान कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान माण तालुक्यात येणार आहेत. जिहे - कटापूर योजनेचे पाणीपूजन पंतप्रधानाच्या हस्ते व्हावे, ही आमदार जयकुमार गोरे यांची इच्छा होती. माढा लोकसभा मतदारसंघात पहिल्यादाच पंतप्रधान येत असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Ramraje Naik - Nimbalkar, Ranjintsinh Naik - Nimbalkar
Buldhana News: दोन गटात हाणामारी; 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष जखमी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com