Solapur, 25 July : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांनीही आपली तयारी चालवली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून काही मतदारसंघाची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे निवडणुकीसाठी निधी गोळा करण्याचे कामही केले जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) निधी संकलनाचे काम 4 जुलैपासून सुरू झाले आहे. या मोहिमेत सहभागी होत कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सचिव, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर (Narsayya Adam Mastar) यांनीही आपल्या मानधनातून 70 हजार रुपये निवडणूक निधी पक्षाकडे सुपूर्द केला आहे.
माजी आमदार नरसय्या आडम हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेऊन हा मतदारसंघ महाविकास आघाडीला सुटावा, यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यांच्या प्रयत्नाला किती यश येते, हे जागा वाटपानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य शखेकडून निवडणूक निधी संकलन करण्यासाठी मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर येथे 4 जुलैपासून निधी संकलनाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्या मोहिमेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या मानधनातून 70 हजार रुपये निवडणूक निधी म्हणून पक्षाकडे सुपूर्द केले आहेत. तसेच, कॉम्रेड श्रीनिवास म्हेत्रे यांनीही आपल्या पगारीतून 51 हजार रुपये पक्षासाठी दिले आहेत.
विधान सभेच्या आगामी निवडणुकीची तयारी करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून बैठक बोलविण्यात आली हेाती. त्यात बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते आडम मास्तर यांना विधानसभेत पाठविण्याचा निर्धार पुन्हा एकदा करण्यात आला आहे.
या वेळी माजी आमदार आडम मास्तर म्हणाले, जनतेच्या आंदोलनाचा, चळवळीचा दबाव आणि प्रभाव सत्ताधाऱ्यांवर पडत असतो. त्यातून काही मागण्या सरकारकडून मान्य होतात. आपल्या जिव्हाळ्याचे प्रश्न आणि न्याय हक्काच्या मागण्या मान्य होण्यासाठी विधी मंडळात या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज असते. त्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता विधीमंडळात पाठवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.