Narsayya Adam's Offer : नरसय्या आडम यांची ऑफर सुशीलकुमार शिंदे स्वीकारणार का?

Solapur Loksabha Constituency : इंडिया आघाडीतील महत्त्वाचे सहकारी पक्ष सोडून जात असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मात्र सोलापुरात काँग्रेस पक्षाला मदत करण्यास तयार आहे.
Narsayya Adam-Sushilkumar Shinde
Narsayya Adam-Sushilkumar ShindeSarkarnama

Solapur News : इंडिया आघाडीतील महत्त्वाचे सहकारी पक्ष सोडून जात असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मात्र सोलापुरात काँग्रेस पक्षाला मदत करण्यास तयार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाला मदत करण्यास तयार आहोत. मात्र, विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ आमच्यासाठी सोडावा, अशी ऑफर काँग्रेसला पर्यायाने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली आहे. मात्र, काँग्रेसकडून त्यावर अद्याप कोणीही भाष्य केलेले नाही. (Loksabha Election-2024)

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर या विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यातील सोलापूर शहर मध्य मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत, त्यामुळे काँग्रेससाठी लोकसभेची निवडणूक सोपी असणार नाही. काँग्रेसला एकेक मित्रपक्ष महत्त्वाचा असणार आहे. (Mahavikas Aghadi)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narsayya Adam-Sushilkumar Shinde
Nanded politics : नांदेडमध्ये दाखल होताच अशोक चव्हाणांंचा काँग्रेसला दणका; भाजपला 55 माजी नगरसेवकांची सलामी...

महत्त्वाचे मित्रपक्ष सोडून गेल्यामुळे इंडिया आघाडी राष्ट्रीय पातळीवर कमजोर झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात ती महायुतीला टक्कर देईल, असे विविध सर्व्हे सांगत आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी मित्रपक्ष महत्त्वाचे आहेत. माजी आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेसपुढे मदतीचा हात केला आहे. मात्र, काँग्रेसनेही अजूनही त्यांना टाळी दिलेली नाही.

नरसय्या आडम यांच्यामुळे सोलापूरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अस्तित्व टिकून आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससोबत असणाऱ्या कम्युनिस्टांकडून सोलापुरात मदत हवी असेल, तर त्यांना विधानसभेला मदत करावी लागणार आहे. मात्र, हक्काचा मतदारसंघ सोडायचा, तर कार्यकर्त्यांचा विचार काँग्रेसला पर्यायाने प्रणिती आणि सुशीलकुमार शिंदे यांना करावा लागणार आहे.

Narsayya Adam-Sushilkumar Shinde
Nanded politics : नांदेडमध्ये दाखल होताच अशोक चव्हाणांंचा काँग्रेसला दणका; भाजपला 55 माजी नगरसेवकांची सलामी...

सोलापूर शहर मध्य हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांनी तीन वेळा निवडणूक जिंकली आहे. आता तोच मतदारसंघ माजी आमदार नरसय्या आडम यांनी मागितला आहे. आडम यांनी यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, गेल्या दोन निवडणुकीत मास्तर हे पाचव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत, पण, ‘रे’ नगरमधील घरांच्या वाटपामुळे आडम यांना आशा निर्माण झाली आहे. पण, काँग्रेस हक्काचा मतदारसंघ सोडून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार का, हा खरा सवाल आहे.

R

Narsayya Adam-Sushilkumar Shinde
Narayan Rane : लोकसभा लढविण्याबाबत नारायण राणेंचे मोठे विधान; म्हणाले, ‘कोणाला सांगायचे ते सांगा...’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com