Umesh Patil : उमेश पाटलांचा अजितदादांना सोडण्याचा निर्णय पक्का; तुतारी वाजविणार की मशाल हाती घेणार?

Mohol Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्ष सोडू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पाटील राजीनाम्यावर ठाम आहेत.
Umesh Patil
Umesh Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 October : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्ष सोडू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, उमेश पाटील आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. महाविकास आघाडीतील पक्षाकडून त्यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण मिळाले असून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार, याची चर्चा मोहोळच्या राजकारणात रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली होती. त्या टीकनंतर दुखावलेल्या उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

तत्पूर्वी राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिल्यानेही पाटील हे नाराज झाले होते, त्यामुळे अजितनिष्ठ म्हणून ओळख असलेले उमेश पाटील (Umesh Patil) यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी उमेश पाटील यांनी आगामी राजकीय वाटचालीसाठी मेळावा घेत अजित पवार यांना सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याच मेळाव्यात काही उत्साही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडण्यासाठी पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे कार्यकर्त्यांकडूनही उमेश पाटील यांच्यावर अजित पवार यांची राष्ट्रवादी सोडण्यासाठी दबाव आहे. त्यातूनच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Umesh Patil
Hasan mushrif : हसन मुश्रीफांच्या सुरक्षेत कसूर; पोलिस व्हॅनविना सहकाऱ्याच्या गाडीतून पोचले कार्यक्रमाला

उमेश पाटील यांना महाविकास आघाडीतील काही पक्षांकडून ऑफर आल्याची माहिती आहे. मात्र, ते कोणता झेंडा हाती घेतात, याकडे मोहोळ तालुक्याचे लक्ष असणार आहे. उमेश पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार याची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.

Umesh Patil
Harshvardhan Patil : आधी बंडखोरी आता काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटलांवर घाव; संजय जगतापांनी केली कोंडी

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काही दिवसानंतर माजी आमदार राजन पाटील यांनीही पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे उमेश पाटील हे विचारपूर्वक पावले टाकत आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. उमेश पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली आहे, त्याबाबत उमेश पाटलांकडून मात्र कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com