Karad : शेतीला दिवसा वीज, एफआरपीचे तुकडे कायदा रद्द करा; शेतकरी संघटनांचे मुख्यमंत्र्यांना साकडे...

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व शेतकरी संघटनेच्यावतीने प्रमुख कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी कराड विमानतळावर भेट घेतली.
Eknath shinde with Shetkari Sanghtna leaders and Prithviraj Chavan
Eknath shinde with Shetkari Sanghtna leaders and Prithviraj Chavansarkarnama
Published on
Updated on

कराड : शेतीपंपाला दिवसा वीज द्यावी, आंदोलनातील शेतकऱ्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा कायदा रद्द करावा, आदी मागण्यावर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आज कराडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन देऊन चर्चा केली. तसेच या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व शेतकरी संघटनेच्यावतीने प्रमुख कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी कराड विमानतळावर भेट घेतली. यामध्ये बळीराजाचे पंजाबराव पाटील चंद्रकांत यादव विश्वास जाधव उत्तम खबाले किशोर पाटील सागर कांबळे स्वाभिमानीचे देवानंद पाटील रामचंद्र साळुंखे दादासो यादव प्रमोद जगदाळे बापूसो साळुंखे रयत क्रांतीचे सचिन नलावडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांच्या शेती पंपाला दिवसा दहा तास वीज द्यावी त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यावरील गुन्हे सरकारने काढून घ्यावे. महाविकास आघाडी सरकारने एफआरपी चे दोन तुकडे करण्याचा कायदा केलेला आहे तो कायदा रद्द करावा. दोन साखर कारखान्यामधील हवाई अंतराची अट रद्द करावी. शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान तात्काळ शेतकऱ्यांना द्यावे,अशा विविध मागण्यावरती मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.

Eknath shinde with Shetkari Sanghtna leaders and Prithviraj Chavan
राजू शेट्टींनी थोपटले दंड; एकरकमी एफआरपी चे आंदोलन पेटले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com