Sugarcane FRP : बबनदादा, राजन पाटील, प्रशांत परिचारक, अभिजीत पाटलांमुळे सोलापुरात ऊसदराची कोंडी : ‘स्वाभिमानी’च्या नेत्याचा घाणाघाती आरोप

Swabhimani Shetkari Sanghatana Leader Allegation : सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी निर्माण होण्यास चार राजकीय नेते जबाबदार असल्याचा आरोप सचिन पाटील यांनी केला. कारखानदारांवर दबाव टाकून दर जाहीर होऊ दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.
Sachin Patil-prashant paricharak- Abhijeet Patil-Rajan patil-babanrao shinde
Sachin Patil-prashant paricharak- Abhijeet Patil-Rajan patil-babanrao shindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 20 November : सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी निर्माण होण्यास माजी आमदार बबनराव शिंदे, प्रशांत परिचारक, राजन पाटील आणि आमदार अभिजीत पाटील हे चार नेते जबाबदार आहेत. या नेत्यांनी साखर कारखानदारांवर दबाव टाकून ऊसदर जाहीर होऊ दिलेला नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही त्यांनी कारखानदारांना बोलू दिले नाही, असा घाणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत ऊसदरावर तोडगा निघू शकला नव्हता. त्यानंतर बुधवारी (ता. 18 नोव्हेंबर) बैठक घेण्यात आली. त्या बैठकीवरच शेतकरी संघटनेच्या नेत्याने आक्षेप घेतला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासनाने ऊसदरप्रश्नी १९ नोव्हेंबरला बैठक बोलावली होती. मात्र, ही बैठक एक दिवस आधीच म्हणजे १८ नोव्हेंबरला रात्री घेण्यात आली. माजी खासदार राजू शेट्टी बैठकीला उपस्थित राहू नयेत, यासाठीच बैठक आधी घेतल्याचा आरोप संघटनेने केला होता. त्यानंतर गुरुवारी (ता. १९ नोव्हेंबर) पंढरपुरात राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी बैठकीत सचिन पाटील यांनी ऊसदराच्या कोंडीसाठी चार नेत्यांना जबाबदार धरले.

हे चारही नेते पक्ष-पार्ट्यांचे राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले आहेत. दिवसभरात चार-चार वेळा एकमेकांशी बोलतात. आम्ही त्यांच्यासाठी तीन-तीन पिढ्या राजकीय संघर्षात घालवल्या. मात्र, शेतकऱ्यांच्या घामाला दाम देण्याची वेळ आली, तेव्हा हे एकत्र आले. आता शेतकऱ्यांनीही यांचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे पाटील म्हणाले.

Sachin Patil-prashant paricharak- Abhijeet Patil-Rajan patil-babanrao shinde
Satara Dcc Bank Chairman : भाजप पक्षांतर्गत कुरघोड्या कोणी केल्या?; शिवेंद्रराजेंच्या कबुलीने नव्या वादाला तोंड फुटलं

पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ३ हजार १५० रुपयांपेक्षा अधिक दर देणार नाही, कारखाने बंद ठेवू, अशी भूमिका मांडण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. कारखाने हे शेतकरी सभासदांच्या मालकीचे आहेत. संचालकांना कारभार करण्यासाठी विश्‍वस्त म्हणून निवडून दिले आहे. मात्र, काही कारखानदार इतर कारखान्यांना दर जाहीर करू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

वीज आणि पाण्याची टंचाई असल्याने शेतकरी ऊसतोडणीसाठी थांबणार नाहीत, याची कारखानदारांना जाणीव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत दर जाहीर करण्यास विलंब केला जात असल्याचे पाटील म्हणाले. अडचणीच्या काळात कारखानदारांनी शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांनाच कोंडीत पकडल्याची टीकाही त्यांनी केली.

Sachin Patil-prashant paricharak- Abhijeet Patil-Rajan patil-babanrao shinde
Solapur Dcc Bank : सुप्रीम कोर्टाचा मोहिते-पाटील, संजयमामा, जगताप, माने, आवताडे, हसापुरेंना दणका; निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार देत फेटाळले अपिल

‘मुंडेंसारख्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कारखाने चालवून दाखवू’

कारखाने चालविण्याची जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर संबंधित कारखानदारांनी राजीनामा देऊन घरी बसावे. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करून कारखाने चालवून दाखवू, असे प्रत्त्युत्तर सचिन पाटील यांनी दिले. एका कारखानदाराने तर बैठकीत ‘आमच्या कारखान्याला ऊस पाठवू नका, बाहेरील कारखान्याला पाठवा,’ असे सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.